Ruturaj Gaikwad  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: T20 मालिकेत ऋतुराजने केली मोठी कामगिरी, कोहली-गुप्टिलचा मोडला रेकॉर्ड!

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने स्वस्तात विकेट गमावली.

Manish Jadhav

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने स्वस्तात विकेट गमावली. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने 12 चेंडूत 10 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने दोन चौकार मारले. ऋतुराजने छोटी इनिंग खेळली असली तरी त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरेतर, ऋतुराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने मार्टिन गुप्टिल आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडला आहे.

दरम्यान, ऋतुराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत एकूण 223 धावा केल्या. त्याचवेळी, न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटर गुप्टिलने कांगारुंविरुद्धच्या टी-20 मालिकेत 218 धावा केल्या होत्या. तर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर कोहली आता 199 धावांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्यापाठोपाठ न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (192) आहे. याशिवाय, भारतासाठी द्विपक्षीय T20I मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 231 धावा केल्या होत्या. केएल राहुल दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 224 धावा केल्या होत्या.

231 - विराट कोहली विरुद्ध इंग्लंड (2021)

224 - केएल राहुल विरुद्ध न्यूझीलंड (2020)

223 - ऋतुराज गायकवाड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)

206 - ईशान किशन विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2022)

204 - श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका (2022)

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात गायकवाड शून्यावर बाद झाला होता. मात्र, त्यानंतर लागोपाठ तीन सामन्यांत त्याने शानदार फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या सामन्यात 58 तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 123 धावा केल्या. चौथ्या टी-20मध्ये गायकवाडने 32 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT