Rohit Sharma stunning catch video Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Catch: वयाच्या 39व्या वर्षी रोहित शर्माची मैदानात 'चित्त्यासारखी' झेप! हवेत डाइव्ह मारत पकडला भन्नाट झेल, पाहा VIDEO

India vs New Zealand 4th ODI Rohit Sharma stunning catch video: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका 'हिटमॅन' रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका 'हिटमॅन' रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत आला आहे. वयाची ३९ वर्षे पूर्ण झाली असतानाही रोहितच्या चपळाईत कोणतीही कमतरता दिसत नसल्याचे चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात रोहितने हवेत झेप घेत उजव्या बाजूला अप्रतिम डाइव्ह मारत शानदार झेल टिपला.

त्याच्या या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज फिन अ‍ॅलनला माघारी परतावे लागले. रोहितच्या या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून रोहितच्या फिटनेस आणि वाढत्या वयावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, मैदानावरील त्याच्या या कामगिरीने त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे.

रोहितच्या एका झेलने बदलले सामन्याचे चित्र

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा डाव चांगल्या स्थितीत होता. सलामीवीर विल यंग आणि फिन अ‍ॅलन भारतीय गोलंदाजांचा सामना करत वेगाने धावा जमवत होते. या दोघांची भागीदारी भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होती. त्यामुळे ही जोडी फोडणे भारतासाठी महत्त्वाचे होते.

अशा परिस्थितीत कर्णधार श्रेयस अय्यरने ३१व्या षटकात चेंडू अक्षर पटेलकडे सोपवला. अक्षरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर फिन अ‍ॅलनने शॉर्ट कव्हरच्या दिशेने फटका मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या रोहित शर्माने क्षणाचाही विलंब न करता उजव्या बाजूला झेप घेतली. हवेत डाइव्ह मारत त्याने चेंडूवर अप्रतिम नियंत्रण मिळवले आणि झेल पूर्ण केला. या एका प्रयत्नाने धोकादायक ठरत असलेल्या अ‍ॅलनची खेळी संपुष्टात आली.

३० चेंडूंत ४१ धावा करणारा अ‍ॅलन माघारी

फिन अ‍ॅलन भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने अवघ्या ३० चेंडूंत ४१ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत वेगवान फटके आणि आक्रमक फलंदाजीचा समावेश होता. विल यंगसोबत मिळून तो न्यूझीलंडच्या धावसंख्येला गती देत होता. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. अक्षर पटेलच्या चेंडूवर अ‍ॅलनने मारलेला फटका रोहितने आपल्या चपळाईच्या जोरावर झेलमध्ये बदलला. रोहितच्या या क्षेत्ररक्षणाचे समालोचकांनीही कौतुक केले. वयाच्या या टप्प्यावरही त्याने दाखवलेली चपळता चाहत्यांसाठी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

विश्वचषक २०२७ साठी रोहितची तयारी?

रोहित शर्मा आता प्रामुख्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतो. त्यामुळे आगामी २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने त्याच्या फिटनेसकडे चाहत्यांचे आणि क्रिकेट विश्लेषकांचे लक्ष आहे. फलंदाजीमध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाही, तरी क्षेत्ररक्षणातून संघासाठी योगदान देण्याची त्याची क्षमता या सामन्यात पुन्हा दिसून आली. रोहितने यापूर्वीही आपल्या अनुभवाच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संघाला मदत केली आहे. त्यामुळे त्याचा हा झेल केवळ एक विकेट मिळवून देणारा क्षण नसून, त्याच्या फिटनेसबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही नवी दिशा देणारा ठरला आहे.

विल यंगचे शानदार शतक

दुसरीकडे, न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंग याने भारतीय गोलंदाजांसमोर दमदार फलंदाजी केली. त्याला डावादरम्यान काही संधी मिळाल्या आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्याने मोठी खेळी उभारली. यंगने १०८ चेंडूंत १२५ धावा केल्या. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. त्यामुळे न्यूझीलंडच्या डावाला भक्कम आधार मिळाला. मात्र, फिन अ‍ॅलनला बाद करण्यासाठी रोहित शर्माने घेतलेला झेल या सामन्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitbull Dog Attack: कुत्रा भुंकण्यावरून वाद, 70 वर्षीय ज्येष्ठाच्या अंगावर सोडला पिटबुल! हळदोणेतील धक्कादायक घटनेत वृद्ध गंभीर जखमी

Farmers Subsidy Increase: गोव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; नुकसानग्रस्तांना मिळणारे अनुदान वाढविणार, कृषिमंत्री संकल्प आमोणकर यांनी घेतला पदभार

Smart Meter Project: स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करता येणार नाही! वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे स्पष्ट संकेत; म्हणाले, 'येणारा काळ तंत्रज्ञानाचा'

Goa Politics: सावर्डेत भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग; विद्यमान आमदार गणेश गावकरांना डावलण्याची मागणी करत सहा नेते एकवटले

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात काँग्रेस आक्रमक, पोलिस मुख्यालयावर काढला मोर्चा; सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी

SCROLL FOR NEXT