Team India Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2022: सलग 8 वा T20 विश्वचषक खेळणार हे दोन धाकड, जाणून घ्या

Team India: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

दैनिक गोमन्तक

T20 World Cup Indian Players: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. T20 विश्वचषक 2007 पासून आयोजित केला जात आहे. तेव्हापासून गेल्या 7 टी-20 विश्वचषकामध्ये हे दोन खेळाडू सातत्याने सहभागी होत आले आहेत. विशेष म्हणजे, 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत देखील ते खेळताना दिसणार आहेत, जो त्यांचा सलग 8 वा टी-20 विश्वचषक असेल. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

हा भारतीय खेळाडू

भारतीय संघाने 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर रोहित शर्माचा त्या संघात समावेश करण्यात आला होता. भारतासाठी प्रत्येक T20 विश्वचषकात (T20 World Cup) तो सहभागी झाला आहे. रोहितने टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळल्या गेलेल्या 33 सामन्यांमध्ये 38.50 च्या सरासरीने 847 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) यावेळी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.

बांगलादेशने अनेक सामने जिंकले

रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) दुसरा खेळाडू शाकिब अल हसन आहे, जो टी-20 विश्वचषकामध्ये सातत्याने सहभागी होत आला आहे. यावेळी शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) बांगलादेशचा कर्णधार आहे. त्याने T20 विश्वचषकातील 31 सामन्यांमध्ये 26.84 च्या सरासरीने 698 धावा केल्या आहेत. तर 41 बळीही घेतले आहेत. फलंदाजीतही तो माहिर आहे.

8 वा T20 विश्वचषक खेळणार

टीम इंडियाचा स्टार रोहित शर्मा आणि शाकिब अल हसन ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्यांचा 8 वा T20 विश्वचषक खेळणार आहेत. त्यांच्याशिवाय ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, मुशफिकुर रहमान, महमुदुल्ला, शोएब मलिक आणि मोहम्मद हफीझ हे खेळाडू आहेत, ज्यांनी 2007 ते 2021 या कालावधीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु ते यंदा खेळत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT