Rohit Sharma | India vs Australia | World Cup 2023 Final ANI
क्रीडा

World Cup 2023: 'निकाल आमच्या बाजूने लागला नाही, पण...', भारताच्या पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma: वर्ल्डकप 2023 फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma react on India vs Australia Final in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले.

या पराभवामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाच्या गोटात या पराभवानंतर निराशेचे वातावरण होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याची निराशा सामन्यानंतर व्यक्त केली. पण असे असले तरी ही स्पर्धा ज्याप्रकारे संघ खेळला, त्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले.

सामन्यानंतर रोहित म्हणाला, 'निकाल आमच्या बाजूने लागला नाही. आम्ही आज चांगले खेळलो नाही. आम्ही सर्व प्रयत्न केले, पण ते झालं नाही. मात्र, संघाचा अभिमान वाटत आहे.'

'20-30 धावा अजून असत्या, तर चांगले झाले असते. केएल राहुल आणि विराट चांगली भागीदारी करत होते त्यामुळे आम्ही 270-280 धावांचा विचार केला होता. पण आम्ही नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

'जेव्हा तुम्ही धावफलकावर 240 धावा लावता, तेव्हा तुम्हाला विकेट्स घेणे गरजेचे असते. मात्र, हेड आणि लॅब्युशेनला श्रेय द्यायला हवे. त्यांनी मोठी भागीदारी करत आमच्यापासून सामना दूर नेला.'

रोहित पुढे म्हणाला, 'आम्ही सर्व प्रयत्न केले, पण कदाचीत संध्याकाळी खेळपट्टीसाठी थोडी चांगली होती. मला पराभवासाठी कोणतेही कारण द्यायचे नाही.'

'आम्ही जास्त धावा केल्या नाहीत. वेगवान गोलंदाजांनी पुढे येत पहिल्या ३ विकेट्स घेतल्या होत्या. आणखी एक विकेट मिळाली असती, तर आम्ही सामना वळवू शकलो असतो. पण मैदानात खेळलेल्या हेड आणि लॅब्युशेनला श्रेय द्यावं लागेल, त्यांनी त्यांच्या भागीदारीने आमच्यापासून विजय हिरावला.'

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. भारताकडून केएल राहुल (66) आणि विराट कोहली (54) यांनी अर्धशतके केली, तसेच रोहितने 47 धावांची खेळी केली. मिचेल स्टार्कने ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांच्या जोडीने चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवले.

हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT