Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: रोहित घेणार मोठा निर्णय, कर्णधारपदाबाबत करु शकतो घोषणा

Rohit Sharma T20 Captaincy: रोहित शर्माशी संबंधित एक मोठी बातमी चांगलीच चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma T20 Captain: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर पूर्णपणे तुटला आहे. इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सनी पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. या सगळ्यामध्ये रोहित शर्माशी संबंधित एक मोठी बातमी चांगलीच चर्चेत आहे. तो लवकरच त्याच्या कर्णधारपदाबाबत मोठी घोषणा करु शकतो.

कर्णधार रोहित लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत टीम इंडियाची (Team India) सुरुवात चांगली झाली होती. यावेळी ग्रुप स्टेजमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा टीम इंडिया देखील होता, पण सेमीफायनल मॅचमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर अशी चर्चा सुरु आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करु शकतो.

मोठ्या स्पर्धेत यश मिळत नाही

गेल्या वर्षभरापासून रोहितने टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळले आहे, पण तो त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही. 2022 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी (T-20 World Cup) टीम इंडियाला आशिया चषक 2022 मध्येही पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतही टीम इंडियाला अंतिम फेरी गाठता आली नव्हती.

कर्णधार म्हणून आतापर्यंतचे विक्रम

रोहित शर्माने आतापर्यंत 2 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. त्‍याने 16 वनडेमध्‍ये टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले आहे, त्‍यापैकी 13 जिंकले आणि 3 पराभव पत्करावे लागले. T20 फॉरमॅटबद्दल बोलायचे झाल्यास, एकूण 51 T-20 सामन्यांमध्ये कर्णधार असताना रोहित शर्माने 39 जिंकले आहेत आणि 12 गमावले आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यावर या खेळाडूला कर्णधारपद मिळाले

टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर 3 टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची समान संख्या होणार आहे. या दौऱ्यावर अष्टपैलू हार्दिक पांड्याला भारताचा T20 कर्णधार बनवण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्हाईट चेंडूच्या क्रिकेट मालिकेला 18 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही देश तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stray Dogs Survey: भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद नाही; आता चावणाऱ्या कुत्र्यांचे सर्वेक्षण

Mapusa RTI Fine: माहिती अधिकारातील टाळाटाळ भोवली; म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्याला 'इतक्या' हजारांचा दंड

Diwali Travel 2026: 'Goa Trip' महागणार! दिवाळीत गोव्यातील हॉटेल्सच्या दरांत 42% वाढीचा अंदाज; व्हिलाचे भाडे तब्बल 5.8 लाखांवर

Meta Fine 25 Billion Dollars: डेटा प्रायव्हसी प्रकरणात 'मेटा'ला झटका! कोर्टाने ठोठावला 2.36 लाख कोटींचा दंड; सिलिकॉन व्हॅली हादरली

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT