Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: रोहितचा पुण्यात हिट जलवा; केले 'हे' 5 मोठे रेकॉर्ड!

IND vs BAN Rohit Sharma 5 Records: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना भारतविरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला जात आहे.

Manish Jadhav

IND vs BAN Rohit Sharma 5 Records: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 17 वा सामना भारतविरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला जात आहे. बांगलादेशविरुद्ध भारताने शानदार सुरुवात केली आहे. 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने डावाची सुरुवात तुफानी पद्धतीने केली.

कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा तूफानी खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत षटकार आणि चौकार लगावले. मात्र, रोहितचे अर्धशतक हुकले आणि तो 48 धावांवर झेलबाद झाला.

अर्धशतक हुकले तरी रोहितने आज 5 मोठे विक्रम केले. चला तर मग बांगलादेशविरुद्ध रोहित शर्माने कोणते 5 मोठे विक्रम केले ते जाणून घेऊया...

चेज करताना सर्वाधिक धावा

दरम्यान, रोहितने बांगलादेशविरुद्ध 40 चेंडूत 48 धावांची खेळी खेळली. या खेळीत रोहितने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. या छोट्या खेळीनंतर रोहितने 5 मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) ICC विश्वचषक 2003 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. 4 सामन्यात 265 धावा करत रोहित पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

याशिवाय, आशियामध्ये खेळताना 6000 धावा करणारा रोहित शर्मा हा सातवा फलंदाज ठरला आहे. रोहितने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये चेज करताना सर्वाधिक धावा करण्याचा तिसरा विक्रम केला आहे.

चेज करताना रोहितने 13 सामन्यांत सर्वाधिक 771 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम शाकिब अल हसनच्या नावावर होता.

एका वर्षात सर्वाधिक षटकार

रोहित शर्माने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारुन चौथा विक्रम केला आहे. रोहितने एका वर्षात 61 षटकार मारुन एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. रोहितने 61 षटकार मारुन इंग्लंडचा (England) फलंदाज इऑन मॉर्गनचा विक्रम मोडला.

मॉर्गनने एका वर्षात 60 षटकार मारले होते. याशिवाय, रोहित शर्मा विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितने विश्वचषकातील 21 डावांमध्ये 1126 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT