Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: 'छोड छाड के अपने...,' रोहितने घेतली लहान मुलांची भेट; Video Viral

IND vs SA 1st T20: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग मोठा आहे.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma Viral Video: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने नुकतेच झालेल्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 जिंकून त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुलांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे.

रोहित मुलांना भेटायला पोहोचला

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तिरुअनंतपुरममध्ये पराभव केला. विजयानंतर रोहित स्टेडियममध्ये उपस्थित मुलांना भेटण्यासाठी पोहोचला. यावेळी, त्याने त्यांना ऑटोग्राफही दिला. काहींनी त्यांच्या आयकार्डवरही ऑटोग्राफ घेतले.

रोहितला खातेही उघडता आले नाही

मात्र, या सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर विराट कोहलीही (Virat Kohli) काही विशेष करु शकला नाही आणि तीन धावा करुन एनरिकचा बळी ठरला. केएल राहुलने 56 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या. त्याचवेळी, सूर्यकुमार यादवने 33 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 50 धावांची शानदार खेळी खेळली.

भारताचा शानदार विजय

तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाला 20 षटकांत 8 विकेट्स गमावून केवळ 106 धावा करता आल्या. यानंतर भारताने 16.4 षटकांत लक्ष्य गाठले. केशव महाराजने सर्वाधिक 41 धावांचे योगदान दिले. त्याने 35 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार मारले.

दुसरीकडे, युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक, रिले रॉसो आणि डेव्हिड मिलर यांची विकेट घेतली. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. दीपक चहर आणि हर्षल पटेल यांनी 2-2 विकेट घेतल्या. सलामीवीर केएल राहुल (51*) आणि सूर्यकुमार यादव (50*) यांनी अर्धशतके झळकावली आणि तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 93 धावांची भागीदारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT