Mumbai Indians Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: मुंबई इंडियन्सच्या 'रोहितसेने'कडूनही चॅम्पियन पोरींचं जोरदार कौतुक, Video ने जिंकली करोडो मनं

वूमन्स प्रीमियर लीग 2023 च्या फायनल सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही उपस्थित होता.

Pranali Kodre

Rohit's Mumbai Indians Cheering Women Team in WPL 2023 Final: रविवारी मुंबई इंडियन्स संघाने रविवारी वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 7 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहिल्या डब्ल्यूपीएलची ट्रॉफी उंचावली.

महत्त्वाचे म्हणजे यावेळी स्टेडियममनध्ये मुंबई इंडियन्सचा पुरुष संघही उपस्थित होता. यामध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव अशा अनेक स्टार खेळाडूंचा समावेश होता.

मुंबई इंडियन्सच्या पुरुष संघातील सदस्यांनी हा संपूर्ण सामना स्टेडियममध्ये बसून पाहिला. तसेच आपल्या महिला संघाला प्रोत्साहनही दिले. हा सामना सुरु असताना विविध परिस्थितीत खेळाडूंचे बदलणारे हावभावही कॅमेरात कैद झाले आहेत.

तसेच जेव्हा नतालिया स्किव्हर-ब्रंटने मुंबईसाठी विजयी चौकार ठोकला, तेव्हा सामना पाहात असलेला मुंबईच्या पुरुष संघानं उभे रहात टाळ्या वाजवून चॅम्पियन संघाचं कौतुक केलं. या क्षणांचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, येत्या 31 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. त्याचमुळे सध्या मुंबई इंडियन्सचा पुरुष संघ एकत्र जमला आहे. मुंबईला आयपीएलच्या या 16 व्या हंगामात पहिला सामना 2 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळायचा आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

मुंबई इंडियन्सने जिंकले विजेतेपद

रविवारी झालेल्या डब्ल्यूपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्लीने 132 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबईने 19.3 षटकात 3 विकेट्स गमावत 134 धावा करत पूर्ण केला.

मुंबईकडून नतालिया स्किव्हरने सर्वाधिक 60 धावांची नाबाद खेळी केली. तसेच हरमनप्रीत कौरने 37 धावांची खेळी केली. दिल्लीकडून राधा यादव आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 131 धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. तसेच शिखा पांडे आणि राधा यादव यांनी अखेरच्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी करत महत्त्वाचे योगदान दिले. या दोघींनीही प्रत्येकी 27 धावांची खेळी केली. मुंबईकडून इजी वाँग आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच एमेलिया केरने 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT