Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

WTC 2023 Final मध्ये खेळण्यासाठी हार्दिकला विचारण्यात आले होते, पण..., पाँटिंगने केला मोठा खुलासा

हार्दिक पंड्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात का खेळला नाही, यामागील कारण पाँटिंगने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Ricky Ponting reveals Hardik Pandya’s response on playing in WTC final: इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पंड्याला का खेळवण्यात आले नाही, असा प्रश्न अनेकांना पडला. पण त्यामागील खरे कारण आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने स्पष्ट केले आहे.

कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 अंतिम सामन्यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने हार्दिकला संधी न देण्याबद्दल बुधवारी समालोचनादरम्यान प्रश्न विचारला होता. ज्यावर पाँटिंगने उत्तर दिले आहे.

हुसेनने विचारले की 'हार्दिक पंड्या कुठे आहे? नाणेफेक होत असताना भारतीय संघ त्यांच्या संघाबद्दल खात्रीशीर नव्हता, तर ऑस्ट्रेलिया संघाबद्दल स्पष्ट होते, यामागे कॅमेरॉन ग्रीन महत्त्वाचा खेळाडू ठरला. तो संघाला इंग्लंडमध्ये समतोलता देतो. तो असा खेळाडू, ज्याच्यासारखा खेळाडू संघात असणे भारताला आवडले असते.'

'नक्कीच शार्दुल ठाकूर वेगावान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू सारखाच आहे. भारतात तुमच्याकडे रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांसारखे खेळाडू आहेत, पण ते भारतीय परिस्थितीत परिपूर्ण अष्टपैलू ठरतात. पण परदेशात जाताना लागणारा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू कुठेय? हार्दिक पंड्या कुठे आहे?'

यावर पाँटिंगने उत्तर दिले की हार्दिकला कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी विचारण्यात आले होते. पण त्याने अन्य खेळाडूंवर हा अन्याय असेल, असे उत्तर दिले.

पाँटिंगने सांगितले की 'त्याने (हार्दिकने) यापूर्वीच स्पष्ट केले होते की त्याचे शरीर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी पुरेसे तयार नाही. संघाला समोतलपणा देण्यासाठी अशा एकमेव कसोटी सामन्यात खेळण्याबद्दल काय वाटते? यावर हार्दिकने उत्तर दिले होते की त्याला असे वाटत नाही की हे गेल्या दोन वर्षापासून या प्रवासात सहभाग घेतलेल्या प्रत्येकासाठी योग्य नसेल.'

तसेच पाँटिंग पुढे म्हणाला, 'हार्दिकने सांगितले होते की मी खूप नैतिकतेने वागणारा खेळाडू आहे. मी अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी 10 टक्केही योगदान दिलेले नाही. अगदी मी एक टक्काही योगदान दिलेले नाही. त्यामुळे मी संघात येऊन कोणाची तरी जागा घेणे योग्य असणार नाही.'

'जर तुम्हाला कसोटी क्रिकेट खेळायचे असेल, तर तुम्ही ती जागा मिळवायला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत मी ती जागा मिळवली नाही, असे मला वाटत नाही, तोपर्यंत मी कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी किंवा भविष्यातील कसोटी मालिकांसाठी उपलब्ध नाही.'

हार्दिकने अखेरचा कसोटी सामना 2018 साली इंग्लंडविरुद्ध साउथँम्पटनला खेळला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत 11 कसोटी सामने खेळले असून 532 धावा केल्या आहेत आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT