Antonio Mateu Lahoz and Lionel Messi Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: मेस्सीला भिडणारा रेफ्री वर्ल्डकपमधून बाहेर, क्वार्टर-फायनलमध्ये झालेला राडा

अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात झालेल्या क्वार्टर-फायनलच्या सामन्यात रेफ्रीबरोबर मेस्सीसह अनेक खेळाडूंचे वाद झाले.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 अखेरच्या टप्प्यात असल्याने प्रत्येक सामना आता महत्त्वाचा आहे. अशातच अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात 10 डिसेंबर रोजी झालेला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लिओनेल मेस्सीने मॅच रेफ्री अँटानिओ मातेउ लाहोज यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती.

आता लाहोज यांना कतारमधून परत पाठवण्यात आले असून ते उर्वरित 4 सामन्यांमध्ये सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. मेस्सीनेही त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यानंतर ते उर्वरित स्पर्धेत भाग घेणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.

लाहोज अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रेफ्री होते. पण या सामन्यात त्यांनी दिलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले. त्यांचे अनेक खेळाडूंशी वादही झाले, यात मेस्सीचाही समावेश आहे.

त्यांनी या सामन्यादरम्यान तब्बल 18 यलो कार्ड खेळाडूंना दाखवले होते. यातील एक कार्ड त्यांनी मेस्सीलाही दाखवले. त्यामुळे या सामन्यानंतर लाहोज चांगलेच चर्चेत होते. या घटनांवर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

मेस्सीनेही सामन्यानंतर म्हटले होते की, 'मला रेफ्रींबद्दल फार बोलायचे नाही. कारण काही बोललो, तर ते लगेचच त्यावर कारवाई करतील. पण मला वाटते लोकांनी काय झाले ते पाहिले. फिफाने त्यांच्याबद्दल विचार करायला पाहिजे. जो व्यक्ती पात्र नाही, त्याला एवढ्या महत्त्वाच्या सामन्यात रेफ्रीचे काम दिले जाऊ शकत नाही.' मेस्सीने असेही म्हटले की लाहोज नेहमीच त्यांच्या विरुद्ध होते.

या घटनेनंतर आता त्यांना परत पाठवल्याचे समजत आहे. दरम्यान अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये जिंकला होता आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता अर्जेंटिना उपांत्य फेरीचा सामना 13 डिसेंबरला (भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता) क्रोएशियाविरुद्ध खेळेल.

असे म्हटले जात आहे की हा मेस्सीचा अखेरचा फिफा वर्ल्डकप आहे. त्यामुळे त्याला यावर्षी विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण करण्याची आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT