Yashasvi Jaiswal Dainik Gomantak
क्रीडा

Yashasvi Jaiswal: झक्कास! गजनीसारखाचं जयस्वालच्या शरिरावर तारखांचा टॅट्यू, कारण ऐकून तुम्हीही म्हणाल...

यशस्वी जयस्वालच्या हातावर आणि पोटावर टॅट्यू आहेत.

Pranali Kodre

मुंबईचा युवा यशस्वी जयस्वाल सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याने गेल्या काही महिन्यांत मुंबईकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 हंगामातही मुंबईकडून हैदराबादविरुद्ध त्याने 195 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती.

जयस्वालने गेल्या काही दिवसात त्याच्या खेळात खूपच प्रगती केलेली आहे. दरम्यान, जयस्वालच्या फलंदाजीचे निरिक्षण केले असेल, तर तुम्हाला त्याच्या हातावर एक टॅट्यूही दिसला असेलच. जयस्वालच्या हातावर पोटावर टॅट्यू केलेले आहेत, पण त्यामागे काही खास कहाणी आहेत.

त्याने एका हातावर I BELIVE आणि त्याबरोबर 16.10.2019 या तारखेचा टॅट्यू केला आहे. जयस्वालसाठी ही तारिख महत्त्वाची आहे कारण याचदिवशी त्याने झारखंडविरुद्ध लिस्ट ए क्रिकेट सामन्यात 203 धावांची खेळी केली होती.

तसेच त्याने दुसऱ्या हातावर I TRUST आणि 07.05.2022 या तारखेचा टॅट्यू केला आहे. या तारखेला त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून पंजाब किंग्सविरुद्ध 68 धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याला पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

या टॅट्यूंबद्दल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत जयस्वालने सांगितले की 'मी टॅट्यू हातावर केला कारण स्वत:वर विश्वास आणि श्रद्धा रहावी. हे खूप महत्त्वाचे आहे. हे टॅट्यू मला आठवण करून देतात की मी कोण आहे आणि मी स्वत:वर विश्वास आणि श्रद्धा का ठेवायला पाहिजे. हे दोन शब्द माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत.'

तसेच त्याने त्याच्या पोटाच्या एका बाजूने त्याच्या वेगवेगळ्या प्रकारात पदार्पण केल्याच्या तारखांचा टॅट्यू केलेला आहे. यात त्याच्या आयपीएल पदार्पण, रणजी पदार्पण, लिस्ट ए पदार्पण, टी20 पदार्पण अशा तारखांचा समावेश आहे. दरम्यान, त्याचे अजून भारतीय राष्ट्रीय संघाकडून पदार्पण झालेले नाही. पण, तो भारताकडून 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.

जयस्वाल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे, तर देशांतर्गत क्रिकेट तो मुंबईकडून खेळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT