Wriddhiman Saha | Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Wriddhiman Saha: जेव्हा किंग कोहलीही होतो साहाचा फॅन, लखनऊविरुद्धच्या तुफानी फिफ्टीनंतर 'असं' केलं कौतुक

लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आक्रमक फिफ्टी ठोकल्यानंतर विराट कोहलीने वृद्धिमान साहाचे कौतुक केले आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Instagram Post for Wriddhiman Saha: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी पार पडलेल्या 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 56 धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाचा मोठा वाटा होता. त्याने या सामन्यात दमदार खेळ केला. त्याच्या खेळीचे विराट कोहलीनेही कौतुक केले.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी केली होती. गुजरातकडून साहाने शुभमन गिलबरोबर सलामीला फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने 20 चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याने तुफानी फलंदाजी करताना गिलबरोबर शतकी भागीदारी केली.

पण त्याला 13 व्या षटकात अवेश खानने बाद केले. साहाने 43 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. हे त्याचे चालू हंगामातील पहिले, तर एकूण आयपीएलमधील 12 वे अर्धशतक आहे. त्याने गिलबरोबर 142 धावांची सलामी भागीदारी केली. त्याच्या या खेळीचे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराटनेही कौतुक केले.

Virat Kohli Instagram Story

विराटने इंस्टाग्राम स्टोरीवर साहाचा सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करत लिहिले की 'अविश्वसनीय खेळाडू.' विराटची ही इंस्टाग्राम स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास गुजरातकडून साहापाठोपाठ शुभमन गिलनेही आक्रमक खेळत नाबाद 94 धावांची खेळी केली. 51 चेंडूत केलेल्या या खेळीत तब्बल 7 षटकार आणि 2 चौकार मारले. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 227 धावांचा डोंगर उभा केला.

त्यानंतर 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने 70 धावांची खेळी केली. तसेच काईल मेयर्सने 48 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच नूर अहमद, राशीद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT