Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: रवींद्र जडेजा पुन्हा बनला RCB चा 'काळ', 3 विकेट्स घेत बनवला नवा रेकॉर्ड

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाने 12 एप्रिल रोजी पहिला विजय नोंदवला.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये कर्णधार म्हणून रवींद्र जडेजाने 12 एप्रिल रोजी पहिला विजय नोंदवला. चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूला सलग चार पराभवानंतर यश मिळाले आहे. रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) नेतृत्वाखाली चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 23 धावांनी पराभव करत आपल्या विजयाचे खाते उघडले. या सामन्यात कर्णधार जडेजा फलंदाजीत विशेष काही करु शकला नाही, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात त्याने कमाल केली. रवींद्र जडेजाने तीन विकेट घेत बाऊंड्री लाइनवर दिनेश कार्तिकचा महत्त्वाचा झेल टिपला. अशा प्रकारे चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) चा पहिला विजय मिळाला. (Ravindra Jadeja took the wicket of Glenn Maxwell for the sixth time in the IPL)

दरम्यान, आरसीबीविरुद्ध रवींद्र जडेजाचा नेहमीच शानदार रेकॉर्ड राहीला आहे. हे 12 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यातही कायम राहिले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा आणि आकाशदीप यांच्या विकेट घेतल्या. त्यापैकी मॅक्सवेलची विकेट खास होती. जडेजाने या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला 12 व्यांदा बाद केले. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 एकत्र केली आहे. आयपीएलमध्ये रवींद्र जडेजाने सहाव्यांदा ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतली. यासह या मॅक्सवेलला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम जडेजाच्या नावावर झाला.

तसेच, आयपीएलमध्ये जडेजाने सहा वेळा बाद होण्याव्यतिरिक्त, ग्लेन मॅक्सवेलला जसप्रीत बुमराह (5 times), अमित मिश्रा ( 5 times), यजुवेंद्र चहल, पियुष चावला, सुनील नरेन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी तीन वेळा बाद केले आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जडेजाने दिनेश कार्तिकचा महत्त्वाचा झेलही घेतला. ड्वेन ब्राव्होच्या चेंडूवर त्याने हा झेल घेतला. हा झेल टिपल्यानंतर जडेजाने आनंद व्यक्त केला.

आरसीबीविरुद्ध जडेजा सर्वात यशस्वी

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट घेताच रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या संघाविरुद्ध त्याने 26 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीविरुद्ध त्याच्यापेक्षा जास्त विकेट इतर कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या नाहीत.

आयपीएल 2021 मध्येही चर्चा रंगली होती

आयपीएल 2021 मध्ये जडेजाने आरसीबी विरुद्ध धडाका लावला होता. त्यानंतर हर्षल पटेलच्या एका षटकात त्याने 37 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याने तीन विकेट्स घेण्याची शानदार कामगिरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

Ponda By Election: फोंड्यात राजकीय ‘पारा’ वाढू लागला! भाजप-काँग्रेस आक्रमक; लैंगिक शोषण प्रकरणाचाही मुद्दा

Indigo Flights: गोव्‍यातून इंडिगोची 6 शहरांची विमानसेवा स्‍थगित! गोमंतकीयांना फटका बसण्‍याची शक्‍यता; 'हे' कारण आले समोर

Ponda By Election: फोंड्यात मुख्यमंत्र्यांसह पाटकर मैदानात! भाजपचा डोळा परप्रांतीय मतांवर; स्मार्ट सिटी बनविण्याची ग्वाही

SCROLL FOR NEXT