Rajat Patidar Century Dainik Gomantak
क्रीडा

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

Rajat Patidar Historic Century: देशांतर्गत टी-20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये मध्य प्रदेशचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार याने तुफानी फलंदाजी करत नवा इतिहास रचला.

Manish Jadhav

Rajat Patidar Historic Century: देशांतर्गत टी-20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या 'सैयद मुश्ताक अली ट्रॉफी'मध्ये मध्य प्रदेशचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदारने तुफानी फलंदाजी करत नवा इतिहास रचला. मध्य प्रदेश आणि आसाम यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात रजत पाटीदारने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत अवघ्या 41 चेंडूत विस्फोटक शतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशने निर्धारित 20 षटकांत 250 धावांचा डोंगर उभा केला.

सामन्यात सुरुवातीला मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) पडझड झालेली असताना, कर्णधार रजत पाटीदार मैदानात उतरला आणि त्याने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने केवळ 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर चौकार-षटकारांची आतिषबाजीच सुरु केली. पाटीदारने केवळ 48 चेंडूत 135 धावांची नाबाद खेळी खेळली. या तडाखेबंद खेळीत त्याने तब्बल 13 गगनचुंबी षटकार आणि 8 चौकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 281.25 इतका प्रचंड होता. पाटीदारच्या येण्यापूर्वी 7.4 षटकांत मध्य प्रदेशच्या 57 धावांवर 3 गडी बाद झाले होते, मात्र त्याने डाव सावरत संघाला 250 धावांपर्यंत पोहोचवले.

विशेष म्हणजे, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात मध्य प्रदेशकडून आतापर्यंत एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. यापूर्वी 2011 मध्ये रजत पाटीदार 96 धावांवर असताना अवघ्या चार धावांशी शतक हुकले होते. मात्र, यंदा त्याने ती कसर भरुन काढली. मध्य प्रदेशकडून या स्पर्धेत शतक करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज बनण्याचा बहुमान त्याने पटकावला. त्याच्या या रेकॉर्डब्रेक कामगिरीमुळे क्रिकेट वर्तुळात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

SCROLL FOR NEXT