Rahul Dravid during a cricket coaching session as reports link him with England head coach role Dainik Gomantak
क्रीडा

'बॅझबॉल' संपले, आता 'द वॉल' युग सुरु होणार! राहुल द्रविड सांभाळणार इंग्लंड क्रिकेटची धुरा? अँडी फ्लॉवर आणि रिचर्ड डॉसन शर्यतीत मागे

Rahul Dravid England Test Head Coach Race: इंग्लंडच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी काही निवडक नावांची यादी तयार करण्यात आली असून, यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

Manish Jadhav

Rahul Dravid England Test Head Coach Race: इंग्लंड क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या बदलांचे वारे वाहू लागले आहेत. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यालाही पदावरुन हटवले. मॅक्युलमच्या गच्छंतीनंतर आता इंग्लिश संघाला रेड बॉल क्रिकेटसाठी नव्या आणि खंबीर मुख्य प्रशिक्षकाचा शोध आहे. 'डेली टेलिग्राफ'च्या ताज्या रिपोर्टनुसार, इंग्लंडच्या कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी काही निवडक नावांची यादी तयार करण्यात आली असून, यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आहे. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले, तसेच 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. द्रविड यांची गुणवत्तेला पारखण्याची क्षमता आणि मैदानातील बारकाव्यांचा अभ्यास करण्याची शैली त्यांना इतर दावेदारांपेक्षा वेगळं ठरवते.

कसोटी क्रिकेटवरील त्यांचे असलेले प्रेम पाहता ते या आव्हानात्मक पदासाठी उत्सुक असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या शर्यतीत राहुल द्रविड यांच्याशिवाय इंग्लंडचे माजी दिग्गज प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि माजी फिरकीपटू रिचर्ड डॉसन यांचीही नावे चर्चेत आहेत. काही क्रीडा रिपोर्टमध्ये भारतीय फिरकीपटू आर. अश्विनचेही नाव समोर आले.

ब्रेंडन मॅक्युलम याच्या कार्यकाळाचा विचार केला तर त्याचा कार्यकाळ कमालीचा चढ-उतारांचा राहिला. त्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने एकूण 49 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यांना 27 सामन्यांत विजय मिळवता आला, तर 20 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. मॅक्युलमच्या प्रशिक्षकपदाखाली इंग्लंडने घरच्या मैदानावर 28 पैकी 18 सामन्यांत विजय मिळवून वर्चस्व राखले, परंतु परदेशातील कामगिरी अत्यंत सुमार राहिली. परदेशी भूमीवर खेळलेल्या 21 कसोटी सामन्यांपैकी इंग्लंडला केवळ 9 सामन्यांतच विजय मिळवता आला.

परदेशातील याच खराब कामगिरीमुळे अखेर मॅक्युलमला आपले पद गमवावे लागले असून, आता इंग्लिश क्रिकेटला पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर नेण्यासाठी राहुल द्रविड यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT