Quinton de Kock: Dainik Gomantak
क्रीडा

SA vs SL: शेवटचा वर्ल्डकप खेळणाऱ्या डी कॉकची शतकासह डिविलियर्सशी बरोबरी, तर कॅलिसला टाकलं मागे

Quinton de Kock: डी कॉकने श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकप २०२३ मधील सामना खेळताना विक्रमी शतक ठोकले.

Pranali Kodre

ICC ODI World Cup 2023, South Africa vs Sri Lanka, Quinton de Kock Century Record:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी करताना तब्बल 428 धावांचा डोंगर उभारला.

दक्षिण आफ्रिकेकडून तीन खेळाडूंनी शतक केले. यामध्ये क्विंटन डिकॉक, रस्सी वॅन दर ड्यूसेन आणि एडेन मार्करम यांचा समावेश आहे. दरम्यान, डिकॉकने पहिले शतक ठोकले. यासह त्याने काही विक्रमही नावावर केले.

आपला अखेरचा वर्ल्डकप स्पर्धा खेळत अलेल्या क्विंटन डी कॉकने 84 चेंडूत 100 धावांची खेळी करताना 12 चौकार आणि 3 षटकार मारले. हे त्याचे कोणत्याही आयसीसी स्पर्धेतील पहिलेच शतक ठरले. त्यापूर्वी त्याला आयसीसी स्पर्धांमध्ये शतक करता आले नव्हते.

दरम्यान, हे त्याचे वनडे कारकिर्दीतील एकूण 18 वे शतक ठरले. त्यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जॅक कॅलिसला मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला आहे. कॅलिसने 17 वनडे शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर हाशिम आमला आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक वनडे शतके करणारे खेळाडू -

  • 27 शतके - हाशिम आमला

  • 25 शतके - एबी डिविलियर्स

  • 21 शतके - हर्षेल गिब्स

  • 18 शतके - क्विंटन डी कॉक

  • 17 शतके - जॅक कॅलिस

डिविलियर्सच्या यादीत स्थान

डी कॉक वनडे वर्ल्डकपमध्ये शतक करणारा डिविलियर्सनंतरचा दक्षिण आफ्रिकेचा दुसराच यष्टीरक्षक फलंदाज आहे. डिविलियर्सने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना 2011 वर्ल्डकपमध्ये मध्ये दोन शतके केली होती. त्याने दिल्लीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 107 धावा केल्या होत्या. तसेच नेदरलँड्सविरुद्ध 134 धावांची खेळी केली होती.

दक्षिण आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर

शनिवारी दक्षिण आफ्रिकेकडून डी कॉक व्यतिरिक्त रस्सी वॅन दर ड्यूसेनने 110 चेंडूत 108 धावा केल्या. तसेच मार्करमने 54 चेंडूत 106 धावा केल्या. डी कॉक आणि ड्यूसेन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 5 बाद 428 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT