Pune Half Marathon 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Pune Half Marathon 2022 : यंदाचा तिसरा हंगाम, सोमवारी होणार पत्रकार परिषद

बहुप्रतिक्षित पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये अनेक नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पुणे : सकाळ माध्यम पुरस्कृत तिसऱ्या ‘बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन’बाबत सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षित पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये अनेक नामांकित धावपटू सहभागी होणार आहेत. या धावपटूंसोबत संवाद साधण्याची संधी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (Pune Half Marathon 2022 News Updates)

आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सक्रियतेचा संकल्प कृतीत उतरविण्याची प्रेरणा देण्यासाठी देण्यासाठी पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येते. या मॅरेथॉनचा मार्ग, धावपटू कोण असतील, यंदाचं मॅरेथॉनमधील आकर्षण याबाबत माहिती देण्यासाठी येत्या सोमवारी 12 सप्टेंबर रोजी बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन कऱण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत मॅरेथॉनमध्ये धावणारे धावपटू उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, पुण्यात अनेक भागांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मॅरेथॉनच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. बदललेला मार्ग कसा असेल याविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येणार आहे. बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन 2018 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे स्पर्धेत दोन वर्षांचा खंड पडला. आता मॅरेथॉनच्या तिसऱ्या हंगामासाठी धावपटू सज्ज झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT