Pro Kabaddi League 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Pro Kabaddi League 2023: लिलावाच्या तारखा जाहीर, 500 हून अधिक खेळाडूंचा होणार लिलाव!

Pro Kabaddi League 2023: प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामाच्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

Manish Jadhav

Pro Kabaddi League 2023: प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या हंगामाच्या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या ताज्या तारखांनुसार, खेळाडूंचा लिलाव 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्यामध्ये 500 हून अधिक खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लगेचच मुंबईत (Mumbai) हा लिलाव होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पीकेएल लिलावात मोठी बोली लागू शकते, असे मानले जात आहे.

वास्तविक, प्रो कबड्डी 2023 लिलाव यापूर्वी 8 आणि 9 सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु आशियाई स्पर्धांमुळे आयोजकांनी तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यानंतर प्रो कबड्डी लीगचा थरार पाहायला मिळणार आहे.

प्रो कबड्डीच्या लिलावाच्या तारखांची घोषणा करताना कमिश्नर अनुपम गोस्वामी म्हणाले की, 'प्रो कबड्डी 2023 लिलाव आशियाई स्पर्धा 2023 नंतर होणार असून हे कळवताना आम्हाला आनंद होत आहे.

खेळाडूंच्या लिलावासाठी चाहते पूर्णपणे उत्सुक असतील याची आम्हाला खात्री आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या सर्व संघांकडे खर्च करण्यासाठी 5 कोटी रुपये असतील.'

खेळाडूंची 4 श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे

प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामातील खेळाडूंच्या लिलावादरम्यान देशी आणि विदेशी खेळाडूंची एकूण चार श्रेणींमध्ये विभागणी केली जाईल. श्रेणी A, B, C आणि D आहेत. श्रेणी A – Rs 30 लाख, B – Rs 20 लाख, C – Rs 13 लाख, D – Rs 9 लाख.

सर्वांच्या नजरा या खेळाडूंवर असतील

लिलावादरम्यान पवन कुमार सेहरावत, मोहम्मद नबीबक्श, मनिंदर सिंग, फजल अत्राचली, विजय मलिक, मोहम्मदरेझा शादलू, विकास कंडोला या स्टार खेळाडूंवर बोली लावली जाईल.

प्रो कबड्डी लीगचा इतिहास

प्रो कबड्डी स्पर्धेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याची सुरुवात 2014 साली झाली. आता लवकरच दहावा हंगाम सुरु होणार आहे. ज्यामध्ये एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT