Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: इंग्लंडमध्ये पृथ्वीचा डंका! डबल सेंच्युरीनंतर आता पुन्हा झळकावलं ताबडतोड शतक, पाहा Video

Prithvi Shaw Century: इंग्लंडमध्ये पृथ्वी शॉची बॅट सध्या चांगलीच तळपत असून त्याने सलग दुसरे शतक ठोकले आहे.

Pranali Kodre

Prithvi Shaw second Century in One-Day Cup 2023 for Northamptonshire:

इंग्लंडमध्ये सध्या रॉयल लंडन वनडे कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताया युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ शानदार कामगिरी करत आहे. त्याने नुकतेच रविवारी या स्पर्धेतील सलग दुसरे शतक ठोकले आहे.

रविवारी नॉर्थहॅम्प्टनशायर संघाकडून डरहॅमविरुद्ध खेळताना शॉ याने नाबाद शतक करत संघाला विजयही मिळवून दिला. चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या सामन्यात शॉ याने ६८ चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने चौकार अन् दोन सलग षटकार मारत नॉर्थहॅम्प्टनशायरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

शॉ या सामन्यात 76 चेंडूत 125 धावांवर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे नॉर्थहॅम्प्टनशायरने 199 धावांचे आव्हान 25.4 षटकात 4 विकेट्स गमावत 204 धावा करत सहज पूर्ण केले.

नॉर्थहॅम्प्टनशायरकडून शॉ व्यतिरिक्त रॉब केओफने 42 धावांची खेळी केली. तसेच डरहॅमकडून जॉर्ज ड्रिसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले.

तत्पुर्वी डरहॅमने प्रथम फलंदाजी करताना 43.2 षटकात सर्वबाद 198 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून लियाम ट्रेवास्कीसने सर्वाधिक 37 धावा केल्या. तसेच जोनाथन बुशनेलने 32 आणि कर्णधार ऍलेक्स लीसने 34 धावांची खेळी केली.

या तिघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. नॉर्थहॅम्प्टनशायरकडून ल्युक प्रोक्टरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या.

शॉने झळकावलेले द्विशतक

दरम्यान, याच स्पर्धेत 9 ऑगस्ट रोजी शॉ याने सोमरसेटविरुद्ध खेळताना डबल धमाका केला होता. त्याने या सामन्यात शानदार द्विशतकी खेळी केली होती. त्याने 153 चेंडूत 244 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने तब्बल 28 चौकार आणि 11 षटकार मारले होते.

ही त्याची लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी देखील ठरली. 23 वर्षीय शॉ सध्या सुरु असलेल्या वनडे कपमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

VIDEO: "मैदानावर क्रिकेट की कुस्ती?" मोहम्मद आमीरच्या स्लेजिंगवर भडकला फहीम अश्रफ, मारण्यासाठी उगारली बॅट; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT