Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw Post: 'आयुष्यात पुढे पाऊल टाकता, तेव्हा...', वनडे कपमधून बाहेर झाल्यानंतर शॉची पोस्ट चर्चेत

Prithvi Shaw Post: शनिवारी रात्री पृथ्वी शॉ याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Pranali Kodre

Prithvi Shaw Instagram Story post after knee injury during one day cup in England :

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने काही दिवसांपूर्वीच नॉर्थम्पटनशायर या इंग्लंडमधील देशांतर्गत संघाकडून पदार्पण केले होते. तो या संघाकडून वनडे कप या इंग्लंडमधील देशांतर्गत लिस्ट ए स्पर्धेत सहभागी झाला होता.

त्याने शानदार सुरुवातही केलेली, मात्र तो या स्पर्धेत खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर आता त्याने इंस्टाग्रावर स्टोरीवर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.

शॉ याला 13 ऑगस्ट रोजी डरहॅमविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गुडघ्याची दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे दुखापतीनंतरही पृथ्वी शॉ डरहॅमविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला होता.

त्याने दमदार फलंदाजी करताना 76 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 7 षटकार मारले होते. त्याच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायरने ६ विकेट्सने विजय मिळवला होता.

मात्र त्याच्या घुडघ्याचे स्कॅन केल्यानंतर असे समजले आहे की त्याची दुखापत गंभीर असून तो या उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच त्याला साधारण 2 महिने तरी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. 

यानंतर शॉ याने शनिवारी रात्री उशीरा इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याचा दुखापतग्रस्त पाय दिसत असून तो पायऱ्यांवर उभा आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने अलंकारीक वाक्य लिहिले आहे.

त्याने लिहिले की 'जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे/वर पाऊल टाकता, तेव्हा लोक हात देतात आणि जेव्हा तुम्ही पायऱ्यांवरून खाली जात असता, तेव्हा नेहमी हात सोडतात.' याबरोबरच त्याने हार्टचा इमोजीही शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या रंगली आहे. पण त्याने असे कॅप्शन का टाकले आहे, याबद्दल खुलासा झालेला नाही.

अर्जुन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छा

दरम्यान, वनडे कपमधून बाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉला त्याचा लहानपणापासूनचा मित्र आणि मुंबई व गोव्याचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या होत्या. अर्जुनने इंस्टाग्रामवर स्टोरीवर शॉ बरोबरचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले होते की 'मित्रा धैर्य ठेव आणि लवकर बरा हो.'

पृथ्वी शॉ चमकला

पृथ्वी शॉ वनडे कपमध्ये नॉर्थहॅम्प्टनशायरकडून चारच सामने खेळू शकला असला, तरी त्याने त्याची वेगळी छाप पाडली आहे. त्याने नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळतानाच त्याच्या लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी केली.

त्याने सोमरसेटविरुद्ध 244 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह 244 धावांची खेळी केलेली. त्यामुळे चार सामन्यातच त्याने 429 धावा केल्या होत्या.

दरम्यान आता शॉवर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवणार आहे. तसेच शॉ याला या दुखापतीमुळे भारतात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेला मुकावे लागणार आहे. तसेच त्याला त्यानंर होणाऱ्या विजय हजारे वनडे स्पर्धेलाही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT