Princeton | FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

प्रिन्सटन आणखी दोन वर्षे एफसी गोवा संघात; 2024 पर्यंत करार कायम

FC Goa : एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून प्रगती साधलेला प्रिन्सटन गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 17 सामने खेळला होता

Kishor Petkar

पणजी : एफसी गोवा संघाने युवा मध्यरक्षक प्रिन्सटन रिबेलो याचा करार आणखी दोन वर्षांसाठी वाढविला, त्यामुळे तो 2024पर्यंत या संघात कायम असेल.

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून प्रगती साधलेला प्रिन्सटन गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 17 सामने खेळला होता. ‘‘माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी ही फार मोठी अभिमानास्पद घटना आहे.

प्रत्येक दिवसागणिक प्रगती साधण्याचे आणि मुख्य संघात स्थान मिळविण्याचे ध्येय बाळगून मी पाच वर्षांपूर्वी एफसी गोवात रुजू झालो होतो. दोन मोसम वास्तववादी ठरले, अजून भरपूर पल्ला गाठण्याची मला जाणीव आहे,’’ असे 23 वर्षीय प्रिन्सटनने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले.

आगामी मोसमाकडे आश्वासकपणे पाहत असून संघात प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने मेहनत घेत आहे. या क्लबसोबत दीर्घकाळ राहण्याचे आणि भरपूर यश मिळविण्याची आशा बाळगून आहे, असेही प्रिन्सटनने नमूद केले.

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी प्रिन्सटनचे कौतुक केले आहे. प्रिन्सटन हा केवळ क्लबसाठी नव्हे, तर देशासाठी मोठे योगदान देण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. मागील दोन मोसमात त्याला मैदानावर महत्त्वपूर्ण वेळ आणि अनुभव मिळाला. त्या बळावर तो पायाभरणी करेल, असा विश्वास रवी यांनी प्रिन्सटनबाबत व्यक्त केला.

छाप पाडण्यासाठी सज्ज

आयएसएल स्पर्धेत तीन मोसम एफसी गोवाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर छाप पाडण्यासाठी प्रिन्सटन रिबेलो आता सज्ज झाला आहे. 2017 तो एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघात दाखल झाला. या संघाने 2018-19 मोसमात गोवा प्रो-लीग स्पर्धा जिंकली, तेव्हा तो संघातील प्रमुख खेळाडू होता. 2019-20 मोसमात त्याने आयएसएल स्पर्धेत पदार्पण केले.

या स्पर्धेत तो एफसी गोवातर्फे 42 सामन्यांत 1723 मिनिटे खेळला आहे. प्रिन्सटन भारताच्या23 वर्षांखालील संघातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळला आहे. आयएसएल स्पर्धेत 2020-21 मोसमापासून त्याला एफसी गोवाच्या सुरवातीच्या संघात स्थान मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT