Kaun Pravin Tambe Twitter
क्रीडा

Kaun Pravin Tambe: वयाच्या 41 व्या वर्षी IPLमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रवीणला अश्रू अनावर

ज्या वयात सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकीर्द संपवली, त्याच वयात तांबेचा खरा प्रवास सुरू झाला.

दैनिक गोमन्तक

साधारणत: वयाची 35 वर्षे ओलांडल्यानंतर सर्व खेळाडू निवृत्तीचा विचार करू लागतात, पण इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये वयाच्या 41 व्या वर्षी व्यावसायिक पदार्पण करणारा खेळाडू पाहायला मिळाला. लेगस्पिनर प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांची कहाणीही अशीच आहे, ज्या वयात सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकीर्द संपवली, त्याच वयात तांबे यांचा खरा प्रवास सुरू झाला.

प्रवीण तांबे कोण ही ओळख निर्माण करण्यासाठी त्याने लेग स्पिनचा वापर केला. तांबेला राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने संधी दिली होती. 1971 (ऑक्टोबर 8) मध्ये जन्मलेल्या प्रवीण तांबेने 2013 मध्ये व्यावसायिक पदार्पण केले. तेव्हा त्याचे वय 41 वर्षांपेक्षा जास्त होते. तांबेने आपल्या पहिल्याच साखळी हंगामात आपल्या गोलंदाजीने सर्व क्रिकेट प्रेमींना प्रभावित केले होते.

प्रवीण तांबे यांच्यावर बनलेल्या या चित्रपटात (Kaun Pravin Tambe) श्रेयस तळपदेने त्याची भूमिका साकारली आहे. तांबेने दीर्घ संघर्षानंतर आयपीएलमध्ये आपले स्थान निर्माण केले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सहकाऱ्यांसोबत त्याने नुकताच स्वतःवर तयार झालेला चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर तो खूपच भावूक दिसत होता.

स्पेशल स्क्रिनिंगनंतर प्रवीण तांबे यांनीही आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला. तो म्हणाला, 'तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही सोडू नका, कारण ते खरे होतात.' कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सदस्यांसोबत हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रवीण तांबे खूप भावूक झाला होता. आपला प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्यापुढे उभा राहिल्याने सहकाऱ्यांसह त्याचेही मन भरून आले.

प्रवीण तांबेने आयपीएलच्या 33 सामन्यात 28 बळी घेतले. त्याचवेळी, टी-20 क्रिकेटमध्ये प्रवीणच्या नावावर 64 सामन्यांमध्ये 70 विकेट आहेत. लेगस्पिनर प्रवीण तांबेवर बनलेला हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार अॅपवर 1 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT