Fernando Santos Dainik Gomantak
क्रीडा

Portugal Football: रोनाल्डोला बेंचवर बसवणाऱ्या कोचचा राजीनामा; इमोशनल Video व्हायरल

पोर्तुगाल फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी राजीनामा दिला आहे.

Pranali Kodre

Fernando Santos: पोर्तुगाल फुटबॉल संघाचे प्रशिक्षक फर्नांडो सँतोस गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होते. आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पोर्तुगाल फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दल पोर्तुगिज फुटबॉल फेडरेशनने माहिती दिली आहे.

सँतोस यांचा राजीनामा पोर्तुगाल संघाला कतारमध्ये झालेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोविरुद्ध पराभव स्विकारावा लागल्यानंतर आला आहे.

पोर्तुगालने या वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीतून अंतिम 16 संघात प्रवेश केला होता. त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडला 6-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पण उपांत्यपूर्व फेरीत त्यांना मोरोक्कोने 1-0 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे पोर्तुगालचे आव्हान संपुष्टात आले होते.

याबरोबरच याच स्पर्धेदरम्यान सँतोस यांनी रोनाल्डोला उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये पहिल्या 11 जणांच्या संघात संधी दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीकाही झालेली. त्यावेळेस शेवटचा वर्ल्डकप खेळणाऱ्या रोनाल्डोला बेंचवर बसवण्यावरून या अनेक चर्चाही झाल्या होत्या.

त्यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती देताना पोर्तुगिज फुटबॉल फेडरेशनने सांगितले आहे की फेडरेशन आणि सँतोस हा प्रवास संपवण्यास तयार आहेत. फिफा वर्ल्डकप 2022 नंतर फेडरेशन आणि सँतोस यांना माहित आहे की आता नवीन चक्र सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

तसेच पोर्तुगिज फुटबॉल फेडरेशनने अशीही माहिती दिली की नवीन प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

दरम्यान सँतोस यांनी सप्टेंबर 2014 मध्ये पोर्तुगाल संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगाल एकदा युरो चॅम्पियन ठरला आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोर्तुगालने 109 सामने खेळले. यातील 67 सामने संघाने जिंकले, तर 23 सामन्यात बरोबरी साधली आणि 19 सामने संघाला पराभूत व्हावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT