37 th National Games 2023 Goa Dainik Gomantak
क्रीडा

गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन - CM प्रमोद सावंत

क्रीडा स्पर्धेची सर्व तयारी 20 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही

Pramod Yadav

37 th National Games 2023 Goa: गोव्यात होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन समारंभ होईल.

क्रीडा स्पर्धेची सर्व तयारी 20 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात 25 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब, कलरीपयट्टू, गटका, लगोरी आणि योगा या पाच देशी खेळांसह 43 विविध राष्ट्रीय खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत आठ हजारहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.

स्पर्धा व्यवस्थित पार पडावी यासाठी आयोजकांकडून काळजी घेतली जात असून, स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी स्वयंसेवकांची ऑनलाईन पद्धतीने भरती केली जाणार आहे.

दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटनास फक्त 15 दिवस उरले आहेत आणि गोव्यातील या स्पर्धेतील तयारीबाबत प्रचंड गोंधळ आहे, आयोजन यशस्वी ठरविण्यासाठी कालावधी अत्यंत कमी असून या कारणास्तव 37 वी राष्ट्रीय स्पर्धा काही महिन्यांसाठी लांबणीवर टाकावी, अशी सूचनावजा मागणी गुजरात राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव आय. डी. नानावटी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT