Place Dhanashree in RCB Abandoned reaction of users to Navdeeps tweet
Place Dhanashree in RCB Abandoned reaction of users to Navdeeps tweet 
क्रीडा

RCB त धनश्रीला स्थान द्या; नवदीपच्या ट्विटवर युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया 

गोमंतक वृत्तसेवा

इंडियन प्रिमिअर लीगच्या 14 व्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. ही स्पर्धा भारतीयांसाठी उत्सवासारखी असते. आयपीएलच्या महोत्सवाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल स्पर्धा ही भारताबरोबर जगातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने स्पॅनिश भाषेत ट्विट केले आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांनी डान्स कोरिऑग्राफर धनश्री वर्माला रॉयल चॅलंजेर्स संघातून खेळवण्याची प्रतिक्रीया दिली आहे. आयपीएल स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज य़ांच्यात चेन्नई येथे होणार आहे. नवदीप सैनीने स्पॅनिश भाषेत एक ट्विट केले. या ट्विटला त्याने 'La Familia' असे कॅप्शन दिले आहे. नवदीपने ट्विटसोबत तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आपल्या रुममध्ये गप्पागोष्टी करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत संघाचा फिरकीपटू गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्माही देखील आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. (Place Dhanashree in RCB Abandoned reaction of users to Navdeeps tweet)

मुंबई इंडियन्सविरुध्दच्य़ा सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर आणि विस्फोटक फलंदाज देवदत्त पडिक्कलची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 22 मार्चला त्याने घेतलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह आला होता. तो आता मुंबईविरुध्दच्या होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार आहे. गेल्या आयपीएलच्या हंगामामध्ये देवदत्तने पदार्पण केले होते.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT