Pat Cummins - Virat Kohli 
क्रीडा

World Cup 2023: 'विराटची विकेट समाधान देणारीच...', प्रेक्षकांना शांत करण्याबद्दल कमिन्स बोललाच

Pat Cummins on Virat Kohli Wicket: विराट कोहलीच्या विकेटबद्दल पॅट कमिन्सने वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Pat Cummins on Virat Kohli's Wicket During India vs Australia in ICC ODI Cricket World Cup 2023 Final:

ऑस्ट्रेलियाने रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना जिंकले. ऑस्ट्रेलियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले आणि विजेतेपदावर हक्क सांगितला.

दरम्यान, या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीची विकेटही ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली होती. तो यंदाच्या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये खेळत होता. त्यामुळे त्याची विकेट जाणे, हे भारतीय संघासाठी आणि चाहत्यांसाठी धक्का देणारे होते. त्याची विकेट कमिन्सने घेतली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून विराटने अर्धशतक केले होते. पण तो 54 धावांवर असताना त्याला कमिन्सने त्रिफळाचीत केले आणि त्याची केएल राहुलबरोबरची 67 धावांची भागीदारीही मोडली. त्यामुळे 1 लाखाहून अधिक आसन क्षमता असलेल्या अमहमदाबादच्या स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

दरम्यान, हा क्षण समाधान देणारा होता, असे कमिन्सने सामन्यानंतर म्हटले आहे. खरंतर कमिन्सने या सामन्यापूर्वी म्हटले होते की 'स्पर्धा भारतात होत आहे, त्यामुळे सहाजिकच अंतिम सामन्यासाठी भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये असतील. पण इतक्या मोठ्या प्रेक्षक संख्येला शांत करण्यापेक्षा मोठा आनंद नसेल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.'

विशेष म्हणजे कमिन्सने त्याचा शब्द राखला होता. याबद्दल सामन्यानंतर कमिन्स म्हणाला, 'प्रेक्षकांमधील शांतता स्विकारण्यसाठी विराटची विकेट गेल्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा हडल (गोलाकार एकत्र येऊन चर्चा) केले.'

'विराट आजही शतक करेल, असं वाटत होतं, जसे तो सध्या सहज करत आहे. त्यामुळे ती विकेट खूप समाधान देणारी होती.'

दरम्यान, विराटची विकेट गेल्यानंतर केएल राहुल देखील 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव झटपट 240 धावांत संपला. 50 षटकात भारताने सर्व विकेट्स गमावल्या. विराट आणि राहुलपूर्वी रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवले. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT