Dhond Smruti Chess Competition Dainik Gomantak
क्रीडा

Chess Competition : पार्थ साळवीला रॅपिड बुद्धिबळात जेतेपद; मंदार लाडला उपविजेतेपद

साईरुद्र नागवेकर तिसरा

किशोर पेटकर

Dhond Smruti Chess Competition : माधव मनोहर धोंड स्मृती अखिल गोवा खुल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ साळवी याने विजेतेपद पटकावले. स्पर्धेत अपराजित राहताना त्याने आठ डाव खेळून साडेसात गुणांची कमाई केली. स्पर्धा पणजीतील महालक्ष्मी देवस्थान सभागृहात रविवारी झाली.

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ अस्थायी समिती आणि महालक्ष्मी देवस्थान यांच्या सहकार्याने स्पर्धा घेतली. मंदार लाड व साईरुद्र नागवेकर यांनी प्रत्येकी सात गुणांची कमाई केली. टायब्रेकर गुणांत त्यांना अनुक्रमे उपविजेतेपद व तिसरा क्रमांक मिळाला.

आर्यन रायकर, शेखर सिरसाट, जॉय काकोडकर, ब्रेंडन पिरोझ, शिवांक कुंकळ्येकर, ईशान पागी, गुंजल चोपडेकर, साहिल शेट्टी, सचिन गावडे, मयुरेश देसाई, सरस पोवार, अवनीश्वर गुईन यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक प्राप्त झाला.

वयोगटात (7 ते 13 वर्षांखालील) नारायण प्रभुदेसाई, सार्थक नाईक, रोनेल फर्नांडिस, शौर्य अग्रासनी, ऋषी गावस, विहान तारी, अर्विन आल्बुकर्क, अभीर प्रभू, साईराज नार्वेकर, कनिष्क सावंत, वेदांत आंगले, चैतन्य गावकर, लव्ह काकोडकर, आयुष नाईक, साहिल नाईक, दृषा घोंगे, तृषा पटेकर, सान्वी देसाई, स्कायला रॉड्रिग्ज, समृती मालकर, म्युरियल फर्नांडिस, दिया सावळ, जेन्सिना सिक्वेरा, लिया सिल्वेरा, जेनिसा सिक्वेरा, श्रीवल्ली गांधी, साईजा देसाई, शुभ्रा आचार्य, सानी गावस, अलिसा कुतिन्हो, इव्हान तेलिस, तन्वी हडकोणकर, प्रसाद नाईक, कविश घारसे, नमेश चुरी यांना बक्षीस देण्यात आले.

स्पर्धेचे पुरस्कर्ते गौरीश धोंड, महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष योगेश धेंपे, महेश कांदोळकर, दत्ताराम पिंगे, अरविंद म्हामल, आतिश आंगले, नरेश पेडणेकर, तनय कैसरे, पल्लवी काकोडकर, संदेश आमोणकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT