Pakistan Cricket Dainik Gomantak
क्रीडा

SL vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा श्रीलंकेवर विक्रमी विजय! भारत-इंग्लंडचा रेकॉर्डही मोडला

Sri Lanka vs Pakistan: पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ४ विकेट्सने विजय मिळवला असून भारत आणि इंग्लंडचा विक्रम मोडला.

Pranali Kodre

Pakistan won by 4 Wickets against Sri Lanka in 1st Test: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील गॉलला झालेल्या पहिल्या सामन्यात गुरुवारी पाकिस्तानने 4 विकेट्सने विजय मिळवला.

पाकिस्तानने हा विजय मिळवत भारत आणि इंग्लंडचा विक्रम मागे टाकला आहे. हा पाकिस्तानचा श्रीलंकेत मिळवलेला 10 वा कसोटी विजय होता. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या परदेशी संघांमध्ये पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आला आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेत 27 कसोटी सामने खेळताना हे 10 विजय मिळवले आहेत. त्यांनी भारत आणि इंग्लंडच्या 9 विजयांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. भारताने श्रीलंकेत 24 कसोटी सामने खेळले असून यातील 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तसेच इंग्लंडने श्रीलंकेत 18 सामने खेळले असून 9 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत 19 सामने खेळताना 8 विजय मिळवले आहेत.

पाकिस्तानचा विजय

गॉलला झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 95.2 षटकात सर्वबाद 312 धावा केल्या.

श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने 122 धावांची खेळी केली, तसेच अँजेलो मॅथ्युजने 64 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी, नसीम शाह आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले.

नंतर पाकिस्तानने पहिल्या डावात 121.2 षटकात सर्वबाद 461 धावा केल्या आणि 149 धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानकडून या डावात सौद शकिलने 208 धावांची खेळी केली. तसेच अघा सलमानने 83 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून रमेश मेंडिसने सर्वाधिक 5 विकेट्स घेतले. त्याचबरोबर प्रभात जयसुर्याने 3 विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेला दुसऱ्या डावात 83.1 षटकात सर्वबाद 279 धावाच करता आल्या. त्यामुळे पहिल्या डावात 149 धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने पाकिस्तानसमोर 131 धावांचे आव्हानच ठेवता आले.

या डावात श्रीलंकेकडून सलामीवीर निशान मदुशकाने 52 धावांची आणि धनंजय डी सिल्वाने 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच पाकिस्तानकडून अब्रार अहमद आणि नोमन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने 32.5 षटकात 6 विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने नाबाद 50 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT