Mickey Arthur | India vs Pakistan  X
क्रीडा

IND vs PAK: 'वर्ल्डकपपेक्षा ही BCCI ची स्पर्धा वाटली', पाकिस्तान क्रिकेट डायरेक्टर आर्थर यांनी साधला निशाणा

Mickey Arthur: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर मिकी आर्थर यांनी खडेबोल सुनावले आहेत.

Pranali Kodre

Pakistan Team Director Mickey Arthur react on Loss Against India at Ahmedabad in ICC ODI Cricket World Cup 2023:

शनिवारी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. हा यंदाच्या स्पर्धेतील भारताचा तिसरा सलग विजय ठरला, तर पाकिस्तानचा पहिला पराभव होता.

या सामन्यासाठी जवळपास सव्वा लाख प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. मात्र, यातील अगदी मोजके प्रेक्षक पाकिस्तानला पाठिंबा देत होते, तर लाखाहून अधिक भारताचे समर्थक स्टेडियममध्ये होते, याबद्दल पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यातील पराभवासाठी निमित्त म्हणून हे कारण वापरणार नाही असे आर्थर यांनी सांगितले, पण त्याचबरोबर त्यांनी एकतर्फी चाहतावर्ग दिसल्याबद्दल मत मांडले आहे.

स्टेडियममध्ये लाखाहून अधिक भारतीय समर्थक असल्याबद्दल आर्थर सामन्यानंतर म्हणाले, 'हे पाहा, जर मी असे म्हटलो की त्याने काही फरक पडला नाही, तर मी खोटे बोलेल. ही स्पर्धा आयसीसीची आहे असे वाटले नाही, हे कटू सत्य आहे. ही एक द्विपक्षीय मालिका वाटली. ही बीसीसीआयची स्पर्धा वाटली. मी दिल दिल पाकिस्तान स्टेडियममध्ये ऐकलेच नाही.'

'त्यामुळे हो, त्या गोष्टीचा परिणाम होतो, पण मी ते पराभवाचा कारण म्हणून वापरणार नाही. कारण आमच्यासाठी तो क्षण जगणे महत्त्वाचे होते, ते पुढच्या चेंडूचा विचार करण्याची बाब होती. ही बाब आम्ही भारतीय खेळाडूंचा आज कसा सामना करू याबाबत होती.'

दरम्यान, पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. मात्र, यापूर्वी २०१६ आणि २०११ ला जेव्हा भारतात जागतिक स्पर्धा झाल्या होत्या, त्यावेळी पाकिस्तानमधील चाहत्यांना व्हिसा देण्यात आला होता. दरम्यान, याबद्दल आर्थर यांना विचारण्यात आले.

त्याबद्दल आर्थर म्हणाले, 'हे पाहा, मला वाटत नाही की मी त्यावर आत्ता काही कमेंट करू शकतो. मला दंड व्हावा असे वाटत नाही. स्टेडियममध्ये भारतीय चाहते दिसणार, हे निश्चितच होते. आम्हाला वाईट वाटले की आमचे समर्थक तिथे नव्हते. त्यांना इथे असणे आवडले असते आणि मला खात्री आहे की भारतीय चाहत्यांना आमचे समर्थक येथे असणे आवडले असते.'

'हे आमच्यासाठी वेगळे वातावरण होते, आमच्या ओळखीचे संगीत नव्हते. त्यामुळे खरं सांगायचं तर असं वाटलं नाही की हा वर्ल्डकपचा सामना आहे. आम्ही यापेक्षा जास्त काही अपेक्षा ठेवली नव्हती. आम्हाला असा सामना आवडते आणि आम्ही या सामन्यात अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही, आणि पाकिस्तानमधील चाहत्यांच्या अपेक्षाही पूर्ण केल्या नाहीत, याबद्दल आम्ही निराश झालो.'

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 42.5 षटकात सर्वबाद 191 धावा केल्या. त्यानंतर 192 धावांचे आव्हान भारताने 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT