Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: पाकिस्तानचा पराभव होताच भारताला झाला मोठा फायदा, कसा ते जाणून घ्या

Pakistan vs England: कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजांची नेहमीच खरी कसोटी असते. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडला.

दैनिक गोमन्तक

World Test Championship Final: कसोटी फॉरमॅटमध्ये फलंदाजांची नेहमीच खरी कसोटी असते. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही बाजूंनी धावांचे डोंगर उभे राहिले, पण शेवटी विजय इंग्लंडचा झाला. पाकिस्तानला 74 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा पराभव होताच टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया....

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे दरवाजे खुले

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 मध्ये, भारतीय संघाला अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, परंतु आता पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचा मोठा दावेदार बनला आहे. यासाठी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये क्लीन स्वीप करावा लागणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारपैकी तीन कसोटी सामने जिंकावे लागतील. त्यानंतर भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दरवाजे उघडतील.

टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे

भारत 52.08 च्या विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका 53.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान (Pakistan) पाचव्या क्रमांकावर कायम आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला अंतिम फेरी गाठणे कठीण दिसत आहे.

पाकिस्तानचा दारुण पराभव झाला

इंग्लंडविरुद्धच्या (England) सामन्यात पाकिस्तानी संघाला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या खेळाडूंनी शानदार खेळ दाखवत 657 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात पाकिस्तानने 579 धावा केल्या. सामन्याच्या एका टप्प्यावर एकतर पाकिस्तान सामना जिंकेल किंवा सामना अनिर्णित राहील, असे वाटत होते. मात्र जेम्स अँडरसन आणि ओली रॉबिन्सन यांच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंड हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT