Pakistan Cricket Team  Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket Team: वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वनडे क्रिकेट खेळणार नाही!

ICC Cricket World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

Manish Jadhav

Pakistan Cricket Team: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल आणि त्यानंतर आशिया कप 2023 खेळताना दिसेल.

त्यानंतर पाकिस्तान थेट आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये दिसेल. मात्र, आणखी एक बातमी समोर आली आहे की, 2023 च्या विश्वचषकानंतर पाकिस्तान संघ एक वर्ष एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही.

दरम्यान, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान (Pakistan) संघाचा प्रवास संपेल तेव्हा हाच सामना पाकिस्तान संघाचा पुढील वर्षातील शेवटचा वनडे सामना असेल. हे कोणत्याही बंदी किंवा इतर कोणत्याही निर्बंधामुळे होणार नाही, तर पाकिस्तान संघाचे इतर कोणत्याही संघासोबत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक नसल्यामुळे होईल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB ने अलीकडेच सुधारित FTP जाहीर केला आहे, ज्यामध्ये एकही एकदिवसीय सामना नाही.

खरे तर, मंगळवार, 18 जुलै रोजी, पीसीबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर 2023-24 साठी FTP (फ्यूचर टूर प्रोग्राम) जाहीर केला, ज्यामध्ये वर्ल्ड कप 2023 नंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा आहे, परंतु संघ 3 कसोटी खेळणार आहे.

डिसेंबर-जानेवारी 2024 मध्ये तिथे सामने होतील. त्यानंतर जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-20 सामने होणार आहेत. न्यूझीलंडचा संघ एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध तेवढेच सामने खेळणार आहे. मे महिन्यात नेदरलँड्सविरुद्ध तीन टी-20 सामने होणार आहेत.

दुसरीकडे, मे 2024 मध्ये आयर्लंड विरुद्ध 2 आणि इंग्लंड (England) विरुद्ध चार T20 सामने समाविष्ट आहेत. पाकिस्तान हे करत आहे कारण जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे आणि त्याच्या तयारीमुळे संघ फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करेल. अशाप्रकारे, पुढील एक वर्षात पाकिस्तानचे एकही एकदिवसीय सामन्याचे वेळापत्रक नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT