Babar Azam Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: बाबर आझमने तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार!

Babar Azam: पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

Manish Jadhav

Babar Azam: पाकिस्तान संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. बाबरने पुन्हा एकदा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार पटकावला आहे.

बाबरने अफगाणिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ऑगस्ट 2023 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला.

दरम्यान, बाबर आझमने (Babar Azam) ऑगस्ट 2023 मध्ये 4 डावात 64 च्या सरासरीने 264 धावा केल्या होत्या. या काळात बाबरने 2 अर्धशतके आणि एक शतक झळकावले.

एवढेच नाही तर बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ऑगस्ट महिन्यातच अफगाणिस्तानविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली.

बाबर व्यतिरिक्त, शादाब खान आणि निकोलस पूरन हे देखील ICC प्लेयर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंमध्ये होते.

तिसऱ्यांदा किताब जिंकला

बाबरने आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज बाबर आझमने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत बाबरचे 882 गुण आहेत.

पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला यापूर्वी एप्रिल 2021 आणि मार्च 2022 मध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथचा किताब देण्यात आला होता.

हा पुरस्कार जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना बाबरने आयसीसीला (ICC) दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, माझ्या संघासाठी आणि माझ्यासाठी शेवटचा महिना खूप छान होता.

बाबर त्याच्या फॉर्मवर खूश आहे

आशिया कपमध्ये पाकिस्तानी प्रेक्षकांसमोर खेळणे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यात मी 150 धावाही करु शकलो. मी हा फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन कारण आशिया कप सुरु आहे.

त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक सुरु होण्यास खूप कमी कालावधी राहिला आहे, असे बाबर म्हणाला. मात्र, भारताविरुद्ध बाबर म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही.

बाबरची एकदिवसीय कारकीर्द

बाबर आझमच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत 107 एकदिवसीय सामन्यांमध्ये 58.48 च्या सरासरीने आणि 89.16 च्या स्ट्राईक रेटने 5380 धावा केल्या आहेत. यामध्ये बाबरने 19 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

Colva Beach Pollution: कोलवा किनाऱ्याची झाली दैना! कचरा आणि अस्वच्छतेमुळे पर्यटकांनी फिरवली पाठ; स्थानिकांनी प्रशासनावर ओढले ताशेरे

Goa Assembly Election 2027: वेळ अजूनही गेलेली नाही! 2012चा इतिहास पुन्हा घडणार? गोव्यात बदलाची हवा वाहण्यासाठी विरोधकांची एकजूट हवीच

Goa Tiger Death: वाघाच्या मृत्यूनं खळबळ! खाणींच्या विळख्यात संपतोय 'जंगलाचा राजा'? पण वनखात्याची सोयीस्कर अनास्था

SCROLL FOR NEXT