Naseem Shah Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NZ: नसीम शाहने केला जागतिक रेकॉर्ड, मॅट हेन्रीला टाकले मागे

PAK vs NZ: नसीमने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 षटकांत 29 धावा देऊन 2 बळी घेतले.

Manish Jadhav

PAK vs NZ: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने शानदार गोलंदाजी करुन सर्वांनाच थक्क केले. नसीमने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 षटकांत 29 धावा देऊन 2 बळी घेतले.

यासह त्याने कारकिर्दीतील पहिल्या 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला.

गुरुवारी रावळपिंडीत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन बळी घेतल्यानंतर नसीमने आता 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 20 बळी घेतले आहेत. हा विक्रम यापूर्वी न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीच्या नावावर होता, ज्याने 6 सामन्यात 19 बळी घेतले होते.

न्यूझीलंडचा वरचष्मा आहे

स्टँड-इन कर्णधार टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पाकिस्तानमध्ये चांगली कामगिरी केली. संघाने टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवल्यानंतर पहिल्या वनडेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरीकडे, आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने सातपैकी पाच वनडे मालिका जिंकल्या आहेत. त्याला 2021 मध्ये इंग्लंड (England) आणि या वर्षी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध दोन पराभव पत्करावे लागले होते.

तसेच, न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील वनडे मालिकेत आतापर्यंत न्यूझीलंडचा वरचष्मा आहे.

त्यांच्यातील शेवटच्या 6 एकदिवसीय मालिकेपैकी, न्यूझीलंडने 5 जिंकले आहेत तर एक अनिर्णित राहिली आहे.

2011 मध्ये मायदेशात पाकिस्तानविरुद्ध त्यांचा शेवटचा मालिका पराभव झाला होता. एकदिवसीय मालिकेतील इतर सामने शनिवारी रावळपिंडी आणि त्यानंतर 3, 5 आणि 7 मे रोजी कराची येथे होणार आहेत.

पाकिस्तान संघ

फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (क), शान मसूद, मोहम्मद रिझवान (व.), आगा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT