Bas De Leede  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: नेदरलँड्स हरला, पण 'या' अष्टपैलू खेळाडूने केली मोठी कामगिरी; 24 वर्षांनंतर...

World Cup 2023: ICC विश्वचषक 2023 चा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

PAK vs NED, World Cup 2023: ICC विश्वचषक 2023 चा दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्स हरला, पण एक खेळाडू असा होता, जो चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.

हा युवा खेळाडू दुसरा कोणी नसून डच अष्टपैलू बास डी लीड आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करत चार बळी घेतले. त्यानंतर, त्याने 67 धावांची शानदार खेळी खेळली.

लीड खास क्लबमध्ये सामील झाला

दरम्यान, बास डी लीड हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या अष्टपैलू कामगिरीसह एका खास क्लबमध्ये सामील झाला आहे. विश्वचषकात पदार्पण करताना चार विकेट आणि अर्धशतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

त्याच्या आधी केवळ दोनच खेळाडूंनी अशी कामगिरी केली होती. यामध्ये डंकन फ्लेचर आणि नील जॉन्सन यांच्या नावाचा समावेश होता. विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासात 24 वर्षांनंतर असा पराक्रम पुन्हा घडला आहे. नील जॉन्सनने 1999 मध्ये अशी कामगिरी केली होती.

विश्वचषकात पदार्पण करताना 4 विकेट्स आणि अर्धशतक झळकावणारे खेळाडू

डंकन फ्लेचर (झिम्बाब्वे) – नाबाद 69 आणि चार विकेटसाठी 42 धावा, विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 1983

नील जॉन्सन (झिम्बाब्वे) – 59 धावा आणि चार विकेटसाठी 42 धावा, विरुद्ध केनिया – 1999

बास डी लीडे (नेदरलँड्स) – 67 धावा आणि चार विकेटसाठी 62 धावा, विरुद्ध पाकिस्तान – वर्ष 2023

हैदराबादमध्ये लीड चमकला

लीडने या सामन्यात एकूण नऊ षटके टाकली. दरम्यान, त्याने 62 धावा देत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 68 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले.

बास डी लीड आणि विक्रमजीतचे अर्धशतक व्यर्थ गेले

नेदरलँडसाठी फक्त पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. बास डी लीडने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याने 68 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. सलामीवीर विक्रमजीत सिंगने 67 चेंडूत 52 धावा केल्या.

लोगान व्हॅन बीकने 28 चेंडूत 28 धावा केल्या. कॉलिन अकरमनने 17 तर साकिब झुल्फिकारने 10 धावा केल्या. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले.

तर हसन अलीने दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद, शादाब खान (Shadab Khan) आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT