KL Rahul  Dainik Gomantak
क्रीडा

Team India: केएल राहुलची कोण घेणार जागा? कसोटी उपकर्णधारासाठी 'हे' 3 खेळाडू आहेत पर्याय

भारतीय कसोटी संघात केएल राहुलच्या ऐवजी उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यासाठी बीसीसीआयकडे तीन खेळाडूंचा चांगला पर्याय आहे.

Pranali Kodre

Team India: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पूर्ण झाले आहेत. या दोन्ही सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता रविवारी (19 फेब्रुवारी) बीसीसीआय निवड समीतीने तिसऱ्या आणि चौथ्या कसोटची सामन्यासाठी भारतीय संघाची निवड केली.

या संघात केएल राहुलला कायम करण्यात आले आहे. मात्र, त्याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. यापूर्वी पहिल्या दोन्ही सामन्यात केएल राहुलने ही जबाबदारी सांभाळली होती. पण आता त्याने ही जबाबदारी गमावली आहे.

सध्या त्याच्यावर खराब फॉर्ममुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्याला संघातून काढून टाकण्याचीही मागणी केली जात आहे. अशात खेळाडू म्हणून त्याच्यावरील विश्वास निवड समीतीने कायम केला असला, तरी आता भारताच्या उपकर्णधारपदासाठी नव्या खेळाडूची निवड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघासाठी उपलब्ध नाही, ते असता तर कदाचीत उपकर्णधार म्हणून त्यांचा विचार आधी झाला असता, कारण यापूर्वी गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत पाचव्या कसोटी सामन्यात बुमराहने नेतृत्व केले होते. तर पंत उपकर्णधार होता.

आता सध्या संघात असलेल्या खेळाडूंपैकी उपकर्णधारपदासाठी भारतीय संघव्यवस्थापनाकडे 3 चांगले पर्याय आहेत. याचबद्दल जाणून घेऊ.

1. चेतेश्वर पुजारा

नुकताच दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम करणारा चेतेश्वर पुजारा या जबाबदारीसाठी एक पर्याय आहे. त्याला बरीच वर्षे खेळण्याचा अनुभव असून तो संघातील सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारे ओळखतो. तसेच त्याने गेल्यावर्षाच्या अखेरीस बांगलादेश दौऱ्यात उपकर्णधारपद सांभाळले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा या जबाबदारीसाठी विचार केला जाऊ शकतो.

2. आर अश्विन

भारतीय संघातील चतुर खेळाडूंपैकी आर अश्विन ओळखला जातो. तो परिस्थिती लवकर समजून घेतो. तसेच तो गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही चांगले योगदान देतो. त्यालाही जवळपास 10 वर्षांहून अधिक वर्षे खेळण्याचा अनुभव आहे. त्याने 450 पेक्षा अधिक कसोटी विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे त्याचाही उपकर्णधारपदासाठी विचार होऊ शकतो.

3. श्रेयस अय्यर

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर देखील उपकर्णधारपदासाठी चांगला पर्याय आहे. तो गेल्या काही काळापासून भारतीय संघाचा नियमित सदस्य असून त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत. त्याचबरोबर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव देखील आहे. त्याचबरोबर तो आयपीएलमध्येही 2018 सालापासून कर्णधार म्हणून खेळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT