Olympiad Chess: Bhakti Kulkarni Dainik Gomantak
क्रीडा

Olympiad Chess: गोव्याच्या भक्तीने भारतीय संघातील स्थान राखले

Olympiad Chess: माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्या नेतृत्वाखालील संघ जाहीर

किशोर पेटकर

पणजी: गतवर्षी ऑनलाईन ऑलिंपियाड बुद्धिबळ (Olympiad Chess) स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविलेल्या भारतीय (India) संघातील स्थान गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिने राखले आहे. यावर्षीही ऑलिंपियाड स्पर्धा ऑनलाईन खेळली जाणार असून स्पर्धेला 15 ऑगस्ट रोजी सुरवात होईल. पाच वेळचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) याच्या नेतृत्वाखालील संघ अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (The All India Chess Federation) जाहीर केला आहे. गतवर्षी भारताने रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले होते. या वाटचालीत भारतीय संघाने चीनलाही मागे टाकले होते. भारतीय संघ यंदाही विजेतेपदासाठी दावेदार असेल.

गतवर्षी ऑनलाईन ऑलिंपियाड, तसेच ऑनलाईन आशिया नेशन्स कप स्पर्धेत विजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाचे भक्तीने प्रतिनिधित्व केले होते. यंदाही दोन वेळच्या राष्ट्रीय विजेतीने भारतीय संघातील स्थान कायम राखल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल व सचिव किशोर बांदेकर यांनी भक्तीचे अभिनंदन केले असून तिला स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत खेळताना भारतीय संघातील सर्व खेळाडू चेन्नई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असतील आणि तेथूनच स्पर्धेत खेळतील. इंटरनेट समस्या येऊ नयेत यासाठी भारतीय बुद्धिबळपटूंना त्रिस्तरीय इंटरनेट सुविधा पुरविली जाईल, अशी माहिती बांदेकर यांनी दिली.

ऑनलाईन ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघ

पुरुष ः विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण, विदित गुजराथी, बी. अधिबन.

महिला ः कोनरू हंपी, डी. हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी

ज्युनियर मुलगे ः आर. प्रग्गनंद, निहाल सरीन

ज्युनियर मुली ः आर. वैशाली, सविताश्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT