Ollie Pope AFP
क्रीडा

IND vs ENG: द्विशतक हुकलं, पण पोपने दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान, भारतामध्ये केला 'हा' पराक्रम

Ollie Pope: ऑली पोपने भारताविरुद्ध हैदराबाद कसोटीत 196 धावांची खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs England, 1st Test at Hyderabad, Ollie Pope Century:

हैदराबादमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चालू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून ऑली पोपने 196 धावा केल्या, याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतर इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरले होते. इंग्लंडकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ऑली पोपने सरुवातीपासून चांगली फलंदाज करत अन्य फलंदाजांना साथीला घेत डाव पुढे नेला.

मात्र, द्विशतकाला अवघ्या 4 धावांची गरज असताना तो दहाव्या विकेटच्या रुपात बाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा डावही चौथ्या दिवशी 102.1 षटकात 420 धावांवर संपुष्टात आला. पोपने 278 चेंडूत 21 चौकारांच्या मदतीने 196 धावांची खेळी केली.

दरम्यान, ऑली पोप भारतामध्ये संघाच्या दुसऱ्या डावात सर्वोच्च खेळी करणाऱ्या विदेशी फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांक मिळवला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर अँडी फ्लॉवर असूण त्यांनी झिम्बाब्वेकडून 2000 साली नागपूर कसोटीत दुसऱ्या डावात नाबाद 232 धावा केल्या होत्या.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर सध्या इंग्लंडचा प्रशिक्षक असलेला ब्रेंडन मॅक्युलम आहे. त्याने न्यूझीलंडकडून 2010 साली हैदराबाद कसोटीतच दुसऱ्या डावात 225 धावांची खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर गारफिल्ड सोबर्स यांनी 1958 साली कानपूर कसोटीत वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावत 198 धावा केल्या होत्या.

भारतामध्ये संघाच्या दुसऱ्या डावात सर्वोच्च खेळी करणाऱ्या विदेशी फलंदाज

  • 232* धावा - अँडी फ्लॉवर, नागपूर, 2000

  • 225 धावा - ब्रेंडन मॅक्युलम, हैदराबाद, 2010

  • 198 धावा - गारफिल्ड सोबर्स, कानपूर, 1958

  • 196 धावा - ऑली पोप, हैदराबाद, 2024

  • 188* धावा - सईद अन्वर, कोलकाता 1999

दरम्यान, इंग्लंडचा डाव 420 धावांवर संपुष्टात आल्याने पहिल्या डावातील १९० धावांच्या पिछाडीमुळे त्यांनी भारतासमोर 231 धावांचे आव्हान ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT