gadre gaspar open 2022 Dainik Gomantak
क्रीडा

‘गद्रे’ गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत ऑलिव्हिया, रितिकाची मुलींत बाजी

पुरुष एकेरीत मानांकित तेजस, प्रणीत उपांत्य फेरीत दाखल

Kishor Petkar

पणजी : ऑलिव्हिया चौगुले आणि रितिका दावलकर यांनी ‘गद्रे’ गास्पार डायस खुल्या टेनिस स्पर्धेत अनुक्रमे 16 वर्षांखालील आणि 12 वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद प्राप्त केले. पुरुष एकेरीत तेजस शेवडे आणि व्ही. प्रणीत यांनी उपांत्य फेरीत जागा मिळविली. स्पर्धा मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस व कांपाल-पणजी येथील पणजी जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर सुरू आहे.

ऑलिव्हियाने 16 वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत तन्वी पाटील हिच्यावर 4-1, 4-1 असा सोपा विजय प्राप्त केला. 12 वर्षांखालील अंतिम लढतीत (Match) रितिकाने आहाना पाटील हिच्यावर 4-1, 4-1 असा विजय नोंदविला.

गास्पार डायस टेनिस (Tennis) स्पर्धेत चार वेळा विजेतेपद मिळविलेल्या तेजसने पुरुष उपांत्यपूर्व लढतीत एम. राजू याला 4-1, 4-1 असे सरळ सेट्समध्ये हरविले. नंतर त्याने ऑलिव्हिया चौगुले हिच्यासह मिश्र दुहेरीचीही अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीत त्यांनी कामाक्षी शानभाग व शिवम बापट जोडीस नमविले. पुरुष एकेरीतील गतविजेता प्रणीत याने उपांत्य फेरीत प्रवेश करताना राहुल सिंग याला 4-3(2), 4-2 असे पराजित केले.

महिला एकेरीत उपांत्य फेरी गाठताना रिबेका जॉर्ज हिने अतिका गौर हिला 6-4 असे नमविले. पुरुषांच्या दुहेरीत काफिल कडवेकर आणि अश्विन नरसिंघानी यांनी राजेंद्र गुदिन्हो व मानो छब्रा जोडीस 4-3(2), 4-2 असे नमवून उपांत्य फेरी गाठली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT