Odisha's claim for play-off maintained Dainik Gomantak
क्रीडा

ओडिशाचा ‘प्ले-ऑफ’साठी दावा कायम

चिवट ईस्ट बंगालला 2-1 फरकाने नमवून सहाव्या क्रमांकावर

दैनिक गोमन्तक

पणजी : ओडिशा एफसीने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवत सोमवारी ईस्ट बंगालचा चिवट प्रतिकार 2-1 फरकाने मोडून काढला आणि आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम राखला. ते आता सहाव्या क्रमांकावर आले.

वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झालेल्या लढतीत ब्राझीलियन जोनाथस ख्रिस्तियन याने 23व्या मिनिटास ओडिशाला आघाडी मिळवून दिली, नंतर 64व्या मिनिटास क्रोएशियन अंतोनियो पेरोसोविच याच्या गोलमुळे ईस्ट बंगालने (bengal) बरोबरी साधली. 75व्या मिनिटास स्पॅनिश मध्यरक्षक हावी हर्नाडेझ याच्या गोलमुळे ओडिशाला पुन्हा वर्चस्व मिळाले.

हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला. ओडिशाचा हा 15 लढतीतील सहावा विजय ठरला असून त्यांचे 21 गुण झाले आहेत. ईस्ट बंगालला 16 लढतीत आठवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 10 गुणांसह त्यांचा दहावा क्रमांक कायम राहिला. ईस्ट बंगाल सलग दुसऱ्या वर्षी साखळी फेरीतच गारद होणार यावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले.

ईस्ट बंगालच्या बचावफळीतील गलथानपणाचा लाभ उठवत ओडिशाने पूर्वार्धात आघाडी घेतली. हावी हर्नांडेझने चेंडूवर ताबा राखत ईस्ट बंगालच्या काही बचावपटूंना चकवा दिला आणि गोलनेटसमोर असलेल्या जोनाथस ख्रिस्तियन याला छान पास दिला. ब्राझीलियन आघाडीपटूने उजव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक शंकर रॉय याला चेंडू अडविण्याचा संधीच दिली नाही. 32 वर्षीय जोनाथसचा हा मोसमातील सहावा गोल ठरला.

तासाभराच्या खेळानंतर ईस्ट बंगालने प्रतिहल्ला चढविला. फ्रान्यो प्रसे याने मध्यक्षेत्रात चेंडूवर ताबा मिळविला आणि ओडिशाच्या बचावफळीस निष्प्रभ ठरवत अंतोनियो पेरोसेविच याला सुरेख पास दिला. क्रोएशियन खेळाडूने डाव्या पायाच्या प्रेक्षणीय फटक्यावर ईस्ट बंगालला बरोबरी साधून दिली. त्याचा हा स्पर्धेतील तिसरा गोल ठरला.

सामन्यातील पंधरा मिनिटे बाकी असताना जोनाथस ख्रिस्तियन व हावी हर्नांडेझ जोडगोळीने पुन्हा ईस्ट बंगालला दणका दिला. यावेळी हावीने जोनाथसच्या असिस्टवर गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. जोनाथस याने ईस्ट बंगालच्या पाच खेळाडूंना मागे टाकत मुसंडी मारली आणि हावीला सुरेख पास पुरविला. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना ओडिशाला आणखी एक गोल करण्याची आयती संधी होती. गोलरक्षक जाग्यावर नसताना हावीच्या फटक्यावर ईस्ट बंगालचा गोलरक्षक हिरा मोंडल याने गोलरेषेवरून ऐनवेळी चेंडू परतावत संघावरील संकट टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajat Patidar Century: 13 षटकार, 8 चौकार, 281 चा स्ट्राईक रेट! तडाखेबंद शतक ठोकून रजत पाटीदारने रचला नवा इतिहास; गोलंदाजांची उडवली झोप

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT