Jonathas Christian DainiK Gomantak
क्रीडा

‘सुपरसब’ ख्रिस्तियन बनला निर्णायक गोलचा शिल्पकार

ब्राझीलियन खेळाडू जोनाथस ख्रिस्तियन (Jonathas Christian) याने साधलेले भेदक हेडिंग ओडिशा एफसीसाठी (Odisha FC) निर्णायक ठरले.

किशोर पेटकर

पणजी: सामन्याच्या निर्धारित वेळेतील नऊ मिनिटे बाकी असताना बदली ब्राझीलियन खेळाडू जोनाथस ख्रिस्तियन (Jonathas Christian) याने साधलेले भेदक हेडिंग ओडिशा एफसीसाठी (Odisha FC) निर्णायक ठरले. त्यामुळे त्यांनी इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल लढतीत शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 1-0 फरकाने हरविले. सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला. थोईबा सिंगच्या असिस्टवर ख्रिस्तियनने 81व्या मिनिटास अप्रतिम हेडिंगने चेंडूला नेटची दिशा दाखविली. यावेळी नॉर्थईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचू याने बाऊन्स झालेला चेंडू झेपावत अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. 32 वर्षीय ब्राझीलियन आघाडीपटूचे यंदा आयएसएलमध्ये पदार्पण आहे. त्याने तिसरा सामना खेळताना प्रथमच गोल साधला. प्रशिक्षक किको रमिरेझ यांनी त्याला 62व्या मिनिटास मैदानावर धाडले होते.

ओडिशा एफसीचा हा चार लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता नऊ गुण झाले असून त्यांना पहिल्या चार संघांत स्थान मिळाले आहे. ते आता दुसऱ्या स्थानी आले आहेत. अव्वल स्थानावरील मुंबई सिटीचे 12 गुण आहेत. नॉर्थईस्ट युनायटेडची निराशा कायम राहिली. त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे पाच लढतीनंतर चार गुण कायम राहिले. त्यामुळे त्यांना नवव्या स्थानी घसरावे लागले. सामन्याच्या पूर्वार्धात नॉर्थईस्टने चांगला खेळ केला, पण त्यांना संधीचा लाभ घेता आला नाही. विशेषतः देशॉर्न ब्राऊनचे अपयश गुवाहाटीच्या संघासाठी सलणारे ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT