Temba Bavuma Dainik Gomantak
क्रीडा

SA vs NED: दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची Playing XI

SA vs NED Toss And Playing XI: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 15 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात धरमशाला येथे खेळवला जात आहे.

Manish Jadhav

SA vs NED Toss And Playing XI: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 15 वा सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नेदरलँड्स यांच्यात धरमशाला येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विश्वचषक 2023 च्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका (South Africa) तिसऱ्या स्थानावर आहे, तर नेदरलँड्स शेवटच्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर या दोघांमधील सामना खेळला जात आहे.

टॉसनंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार काय म्हणाला?

नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करु. ओव्हरकास्ट कंडीशन पाहता इथे बॉल स्विंग होऊ शकतो. हे छोटे मैदान आहे, त्यामुळे इथे धावा वाचवणे कठीण होणार आहे.

आम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. मला वाटतं आम्ही सुरुवातीला काही विकेट घेतल्या तर त्यांना आम्ही कमी टोटलपर्यंत रोखू शकतो. संघात आत्मविश्वास वाढत आहे. आशा आहे की, आम्ही चांगली कामगिरी सुरु ठेवू.”

नेदरलँडचा कर्णधार काय म्हणाला?

नाणेफेकीनंतर नेदरलँड्सचा (Netherlands) कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी केली असती पण दुर्दैवाने आम्ही ते बदलू शकत नाही. आम्ही आता चांगली कामगिरी करु शकतो. परिस्थितीशी जुळवून घेणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.”

दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेन्रिच क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, लुंगी एनगिडी.

नेदरलँड्सची प्लेइंग इलेव्हन

विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, तेजा निडानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सिब्रांड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT