Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: '...मग थेट पाकिस्तान उपांत्य फेरीत धडक मारेल'; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम पाहायला मिळत आहे. काल ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करुन उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची धूम पाहायला मिळत आहे. काल ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करुन उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले. तर दुसरीकडे, पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे.

एकवेळ पाकिस्तान या विश्वचषकातून बाहेर पडेल असे वाटत होते, परंतु त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याचा दावा केला आहे.

आयसीसीच्या नियमामुळे पाकिस्तानला विशेष फायदा होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत सहज प्रवेश मिळेल. असे झाल्यास आयसीसीकडून पाकिस्तानसाठी ही मोठी भेट मानली जाईल.

3 संघ आधीच पात्र झाले आहेत

दरम्यान, 3 संघ आधीच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आता चौथ्या स्थानासाठी 3 संघांमध्ये शर्यत आहे. या शर्यतीत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आहेत.

पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी विश्वचषकातील 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे गुण समान असून नेट रनरेट देखील जवळ आहे.

अशा स्थितीत, तुम्ही कधी विचार केला आहे की, गुणांव्यतिरिक्त, कोणत्याही दोन संघांचा नेट रनरेट देखील किती आहे? त्या आधारावरही दोन्ही संघांपैकी एकाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळेल.

आयसीसीचा नियम पाकिस्तानच्या बाजूने जाईल

आयसीसीच्या (ICC) नियमानुसार, कोणत्याही दोन संघांचे गुण आणि नेट रनरेट समान असल्यास उपांत्य फेरीतील प्रवेश त्या संघाला दिला जाईल जो विश्वचषकाच्या साखळी सामन्यात विजयी संघ ठरला आहे.

अशा परिस्थितीत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात विजयी संघ पाकिस्तान होता. यावरुन हे स्पष्ट होते की, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या गुणांव्यतिरिक्त नेट रनरेट समान असेल तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. पाकिस्तान संघासाठी हे मोठे गिफ्ट असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT