Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Novak Djokovic: चालू सामन्यातच जोकोविचचा पारा चढला, वैतागून थेट रॅकेटच तोडली, पाहा Video

Video: विम्बल्डन 2023 फायनलमध्ये जोकोविचने रागाच्या भरात रॅकेट तोडली होती.

Pranali Kodre

रविवारी स्पेनच्या कार्लोस अल्कारेजने विम्बल्डन 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात 23 वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यानंतर जोकोविचने 20 वर्षीय अल्कारेजचे कौतुकही केले. पण त्यापूर्वी सामन्यादरम्यान नोव्हाक जोकोविच चांगलाच भडकला होता. त्याने रागाच्या भरात त्याची रॅकेटही तोडली.

अव्वल मानांकित अल्कारेजने जोकोविचला ४ तास ४२ मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 असे पराभूत केले. दरम्यान जोकोविचने रॅकेट तोडण्याची घटना पाचवा आणि निर्णायक सेट सुरु असताना घडली.

या सेटदरम्यान अल्कारेजविरुद्ध एक सर्व्ह गमावल्यानंतर जोकोविचचा पार चढला होता. त्याने रागाच्या भरात नेट पोस्टवर त्याची रॅकेट जोरात आपटली. त्यामुळे रॅकेट मोडली. दरम्यान, या घटनेबद्दल त्याला लगेचच चेतावणीही देण्यात आली.

जोकोविच दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्येही चिडलेला दिसला होता. दरम्यान, सुदैवाने त्याची रॅकेट कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा चाहत्याला लागली नाही.

सामन्यानंतर या घटनेबद्दल जोकोविच म्हणाला, 'त्याबद्दल जास्त काही बोलण्यासारखे नाही, ती फक्त निराशा होती.'

अल्कारेजचे शानदार पुनरागमन

या सामन्यात जोकोविचने शानदार सुरुवात केली होती. त्याने पहिल्या सेटमध्ये पूर्ण वर्चस्व ठेवले होते आणि हा सेट 6-1 असा सामना आपल्या नावे केला होता. पण त्यानंतर अल्कारेजने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये चिवट खेळ करत टायब्रेकमध्ये विजय मिळवला.

त्यानंतर तिसरा सेटही अल्कारेजने 6-1 असा सहज जिंकला. पण जोकोविचनेही चौथ्या सेटमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर पुनरागमन करण्यात यश मिळवले. त्याने चौथा सेट जिंकत सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये जाईल, याची काळजी घेतली. मात्र, अखेरच्या सेटमध्ये जोकोविचला पुन्हा अल्कारेज भारी पडला आणि त्याने विजेतेपदही जिंकले.

जोकोविचने केले अल्कारेजचे कौतुक

अंतिम सामन्यानंतर मात्र जोकोविचने अल्कारेजला परिपूर्ण खेळाडू म्हणत त्याचे भरभरून कौतुक केले. तसेच त्याने असेही म्हटले की 'प्रामाणिकपणे सांगायचे, तर मी त्याच्यासारख्या खेळाडूविरुद्ध कधीही खेळलो नव्हतो.'

जोकोविच म्हणाला,  'मला वाटते लोक गेल्या 12 महिन्यांपासून त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत की त्याच्यामध्ये रॉजर (फेडरर), राफा (राफेल नदाल) आणि माझ्यातील काहीतरी घटक आहेत. मी याच्याही अगदी महमत आहे. माझ्यामते त्याच्याकडे आमच्या तिघांमधील सर्वोत्तम घटक आहेत.'

सलग पाचव्या विम्बल्डनचे स्वप्न भंगले

दरम्यान, जोकोविच कारकिर्दीतील आठवे आणि सलग पाचवे विम्बल्डन विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने सेंटर कोर्टवर उतरला होता. पण त्याला कार्लोसने पराभवाचा धक्का दिला. जोकोविचने यापूर्वी झालेल्या चारही विम्बल्डन स्पर्धांमध्ये विजेतेपदाला गवसणी घातली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT