North Korea withdraws from Tokyo Olympics 
क्रीडा

टोकियो ऑलिम्पिकमधून उत्तर कोरियाची माघार

गोमंतक वृत्तसेवा

जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय उत्तर कोरियाने घेतला आहे. देशाच्या क्रिडामंत्र्यांनी यासंबंधीची माहीती दिली आहे. 1988 शीतयुध्दानंतर उत्तर कोरिया ऑलिम्पिकमधून पहिल्यांदाच बाहेर पडला आहे. टोकियोमध्ये मागील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे दुसऱ्या महायुध्दानंतर त्या पहिल्यांदाच पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

‘’समितीने हा निर्णय घेतला आहे, 32 व्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये उत्तर कोरिया भाग घेणार नाही. उत्तर कोरियाला कोरोना महामारीपासून खेळाडूंचे रक्षण करायचे आहे,’’ असे उत्तर कोरियाच्या क्रिडा मंत्र्यांनी म्हटले आहे. उत्तर कोरिया ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये व्यवसायिक क्रिडा तंत्रज्ञान कसे विकसीत करावे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके कशी मिळवावीत त्याचबरोबर येणाऱ्या पाच वर्षामध्ये क्रिडाविषयक उपक्रमांना प्रोत्साहित देणे यासारख्या बाबींवर चर्चा झाली आहे. (North Korea withdraws from Tokyo Olympics)

तर दुसरीकडे दक्षिण कोरियाच्या एकिकरण मंत्रायलयाने मंगळवारी उत्तर कोरियाच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करत म्हटले की, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा दोन्ही देशामधील संबंध सुधारण्याचा मार्ग होईल, अशी आशा होती. त्यावर जपानच्या ऑलिम्पिक समितीने म्हटले की, उत्तर कोरियाने अद्याप त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार नसल्याची माहीती दिली गेलेली नाही.
2018 मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उत्तर कोरियाने 22 खेळाडू पाठवले होते. यामध्ये सरकारी अधिकारी, कलाकार, पत्रकार, वगळता महिलांच्या चीअरिंग ग्रुपमध्ये 230 सदस्य सहभागी होते.

आगामी वर्षात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT