National Game Goa  2023
National Game Goa 2023  Dainik Gomantak
क्रीडा

National Game Goa 2023 : पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये

गोमन्तक डिजिटल टीम

National Game Goa 2023 : पणजी, ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंडमध्ये घेण्यात येणार आहे. बांबोळी गोवा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आज सायंकाळी उशिरा झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या उपस्थितीत उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांनी भारतीय ऑलिपिंक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांच्या हस्ते आयोजनाचा ध्वज स्वीकारला.

समारोप सोहळ्यावेळी मंचावर राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, उत्तराखंडच्या क्रीडामंत्री उषा आर्य, महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक,

मंत्री नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार जेनिफर मोन्सेरात, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा होत्या.

श्रीहरी, संयुक्ता, प्रणोती सर्वोत्तम : गतवर्षी गुजरातमधील स्पर्धेत विजेते ठरलेल्या सेनादलाला (६६ सुवर्ण, २७ रौप्य, ३३ ब्राँझसह एकूण १२६ पदके) यंदा दुसरा, तर हरियानाला (६२ सुवर्ण, ५५ रौप्य, ७५ ब्राँझसह एकूण १९२ पदके) तिसरा क्रमांक मिळाला. पुरुष गटात कर्नाटकचा जलतरणपटू श्रीहरी नटराज सर्वोत्तम ठरला,

तर महिलांत महाराष्ट्राची जिम्नॅस्ट संयुक्ता काळे व ओडिशाची प्रणोती नायक यांना संयुक्तपणे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. नटराजने जलतरणात ८ सुवर्ण, १ रौप्य व १ ब्राँझ अशी एकूण १० वैयक्तिक पदके जिंकली. संयुक्ता व प्रणोती यांनी जिम्नॅस्टिक्समध्ये प्रत्येकी ४ सुवर्ण व १ रौप्यपदक जिंकले.

द्विशतकी पदके

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात द्विशतके पदके जिंकण्याचा पराक्रम साधलेल्या महाराष्ट्राने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान पटकावला. त्यांनी ८० सुवर्ण, ६९ रौप्य व ७९ ब्राँझ अशी एकूण २२८ पदकांची कमाई केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या वतीने क्रीडामंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर आणि पथक प्रमुख स्मिता शिरोळे यांनी करंडक स्वीकारला.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये गुरुवारी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राने स्पर्धेत १९९४ नंतर प्रथमच सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक प्राप्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

NEET Exam: गोव्यातील चार हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेण्याची NSUI ची मागणी

Mining Transport: खनिज वाहतूकप्रश्‍नी सरकारला कानपिचक्या! कोर्टाने केल्या महत्वाच्या सूचना

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT