FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवा संघात येणार नवे खेळाडू

सहा खेळाडूंना व्यवस्थापनाने केले मुक्त

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघ आगामी मोसमासाठी नव्या खेळाडूंना करारबद्ध करणार आहे. मागील मोसमात खेळलेल्या सहा खेळाडूंना त्यांनी बुधवारी मुक्त केले. यामध्ये संघ व्यवस्थापनाने 31 मे रोजी करार संपलेले इव्हान गोन्झालेझ, आल्बर्टो नोगेरो, ऐराम काब्रेरा हे स्पॅनिश, डिलन फॉक्स हा ऑस्ट्रेलियन, तसेच अलेक्झांडर रोमारियो जेसूराज व ख्रिस्ती डेव्हिस या भारतीय खेळाडूंना मुक्त केले आहे. (New players to join FC Goa)

2022 - 2023 मोसमासाठी एफसी गोवा संघात आता या खेळाडूंच्या जागी नवे सदस्य येतील. मुक्त केलेल्या खेळाडूंनी संघासाठी बजावलेल्या सेवेबद्दल क्लबने त्यांचे आभार मानले असून भावी कारकिर्दीसाठी सुयश चिंतिले आहे.

गोन्झालेझ व नोगेरा 2022 मध्ये एफसी गोवा संघात दाखल झाले. ते 2022-21, 2021-22 असे दोन मोसम खेळले. रोमारियो याने 2019 मध्ये करार केला होता. फॉक्स व काब्रेरा 2021 मध्ये संघात रुजू झाले. 2021-22 मोसमात ते एफसी गोवा संघात होते. डेव्हिस 2019 मध्ये एफसी गोवाच्या डेव्हलमेंट संघाशी करारबद्ध झाला. 2021 त्याला मुख्य संघात बढती मिळाली.

वाझकेझचा केरळा ब्लास्टर्सला निरोप

स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने केरळा ब्लास्टर्सचा निरोप घेतला आहे. वाझकेझ 2021-22 मोसमात आयएसएल उपविजेत्या केरळा ब्लास्टर्सचा मुख्य खेळाडू होता. 31 वर्षीय आघाडीपटू मोसमात 23 सामने खेळला. त्याने आठ गोल व दोन असिस्ट अशी कामगिरी नोंदविली. बार्सिलोना येथे जन्मलेला वाझकेझ आरसीडी इस्पॅन्योल संघातर्फे ला लिगा स्पर्धेत खेळला. नंतर त्याने गेटाफे सीएफ, तसेच स्वॅन्सी सिटी, जिम्नॅस्टिक द तारागोना, रियाल झारागोझा, स्पोर्टिंग द गिजॉन आदी सघांचे प्रतिनिधित्व केले. ला लिगा स्पर्धेत तो 150 पेक्षा जास्त, तर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये 12 सामने खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT