Pakistan vs Netherlands 
क्रीडा

World Cup 2023: पहिल्या सामन्यात पाकिस्तान ऑल-आऊट! नेदरलँड्सला विजयासाठी 287 धावांची गरज

Pakistan vs Netherlands: पाकिस्तानचा संघाने नेदरलँड्समोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, Pakistan vs Netherlands:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होत आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्समोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील पहिला सामना आहे.

या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पाकिस्तान प्रथम फलंदाजीसाठी उतरले, पण पाकिस्तानचा संघ 49 षटकात 286 धावांवर सर्वबाद झाला. नेदरलँड्सकडून बास द लीडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानकडून फखार जमान आणि इमाम-उल-हक यांनी सलामीला फलंदाजी केली. मात्र ते फार वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. चौथ्याच षटकात फखर 12 धावांवर बाद झाला, तर 9 व्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला 5 धावांवरच कोलिन एकरमनने बाद केले.

त्याच्या पुढच्याच षटकात इमामही 15 धावा करून बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था 3 बाद 38 धावा अशी झाली होती.

मात्र, यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शाकील यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे पाकिस्तानने १५० धावांचा टप्पा सहज ओलांडला.

मात्र, त्यांची भागीदारी 29 व्या षटकात शाकीलला आर्यन दत्तने बाद करत तोडली. शाकील 52 चेंडूत 68 धावा करून बाद झाला. यानंतर 32 व्या षटकात बास द लीडने रिझवानला त्रिफळाचीत केले. रिझवानने 75 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ ३२ व्या षटकातच लीडने इफ्तिखार अहमदलाही 9 धावांवर माघारी धाडले.

पण यानंतर मोहम्मद नवाझ आणि शादाब खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत पाकिस्तानला 250 धावांचा टप्पा पार करून दिला. पण लीडने पुन्हा 44 व्या षटकात पाकिस्तानला दोन धक्के दिले. त्याने शादाबला 32 धावांवर त्रिफळाचीत केले, तर पहिल्याच चेंडूवर हसन अलीलाही पायचीत केले.

त्यानंतर मोहम्मद नवाज 39 धावांवर 47 व्या षटकात धावबाद झाला, तर हॅरिस रौफला 16 धावांवर एकरमनने बाद करत पाकिस्तानचा डाव संपवला. अखेरीत शाहिन आफ्रिदी 13 धावांवर नाबाद राहिला.

नेदरलँड्सकडून बास द लीडव्यतिरिक्त कोलिन एकरमनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच आर्यन दत्त, लोगन वॅन बिक आणि पॉल वॅन मिकरन यांनी प्रत्येक एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT