Nepal vs Mongolia Twitter/ICC
क्रीडा

NEP vs MGL: अबब! टी20 मध्ये 314 धावा, 9 चेंडूत फिफ्टी अन् 273 धावांनी विजय... नेपाळने रचले विश्वविक्रम

Asian Games: नेपाळच्या खेळाडूने 9 चेंडूत अर्धशतक करत तब्बल 16 वर्षांनंतर युवराजचा विश्वविक्रम मोडला आहे.

Pranali Kodre

Nepal vs Mongolia Record Break T20I Match in Asian Games Hangzhou:

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच सामना विश्वविक्रमी ठरला आहे. बुधवारी नेपाळ आणि मंगोलिया हे दोन क्रिकेट संघ आमने-सामने होते. या सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तब्बल 5 नवे विश्वविक्रम रचले गेले आहेत.

या सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 314 धावा उभारल्या. नेपाळकडून कुशल मल्लाने 50 चेंडूत 8 चौकार आणि 12 षटकारांसह 137 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार रोहित पौडेलने 27 चेंडूत 61 धावा केल्या, तर दिपेंद्र सिंगने 10 चेंडूत 8 षटकारांसह नाबाद 52 धावा केल्या.

त्यानंतर 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मंगोलिया संघ 13.1 षटकातच 41 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे हा सामना नेपाळने 273 धावांनी जिंकला.

या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या, सर्वात जलद शतक-अर्धशतक, सर्वात मोठा विजय, सर्वाधिक षटकार असे अनेक विश्वविक्रम रचले गेले.

सर्वाधिक षटकार

या सामन्यात नेपाळ संघाने मिळून तब्बल 26 षटकार मारले. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात एका डावात मारण्यात आलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. यापूर्वी हा विक्रम अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या नावावक होता. अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध 2019 मध्ये, तर वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2023 मध्येच प्रत्येकी 22 षटकार मारले होते.

सर्वोच्च धावसंख्या

त्याचबरोबर नेपाळने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याही उभारली. त्यांनी अफगाणिस्तान आणि चेक गणराज्य संघाचा विक्रम मोडला. अफगाणिस्तानने 2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या, तर चेक गणराज्यने 2019 मध्ये तुर्कीविरुद्ध 4 बाद 278 धावा केल्या होत्या.

सर्वात मोठा विजय

नेपाळने 273 धावांनी विजय मिळवत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यापूर्वी हा विक्रम चेक गणराज्य संघाच्या नावावर होता. त्यांनी 2019 मध्ये तुर्कीविरुद्ध 257 धावांनी विजय मिळवला होता.

सर्वात जलद शतक-अर्धशतक

दरम्यान, याच सामन्यात दिपेंद्र सिंग ऐरेने केवळ 9 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे त्याने तब्बल 16 वर्षांपूर्वीचा युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडला. युवराजने 2007 टी२० वर्ल्डकपमध्ये 12 चेंडूत अर्धशतक केले होते.

तसेच कुशल मल्ला याने 34 चेंडूत शतक केल्याने त्याने डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि सुदेश विक्रमसेकरा यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याच्या विक्रमाला मागे टाकले. यापूर्वी मिलर, रोहित, सुदेश यांच्या नावावर संयुक्तरित्या सर्वात जलद शतकाचा विक्रम होता. या तिघांनीही 35 चेंडूत शतक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT