Nehal B Sawal Desai Pro Kabaddi League Dainik Gomantak
क्रीडा

Pro Kabaddi League : प्रो-कबड्डीसाठी गोव्याच्या नेहालची निवड

पहिला गोमंतकीय खेळाडू; यूपी योद्धास संघाकडून दहा लाख रुपयांत करारबद्ध

किशोर पेटकर

Vivo Pro Kabaddi League Auction 2022 : आगामी प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी नवव्या हंगामासाठी गोव्याचा युवा खेळाडू नेहाल सावळ देसाई याला यूपी योद्धास संघाने दहा लाख रुपयांच्या बोलीवर करारबद्ध केले. स्पर्धेसाठी निवडला गेलेला तो पहिला गोमंतकीय कबड्डीपटू ठरला आहे.

हल्लीच हरियाणात झालेल्या 69व्या राष्ट्रीय सीनियर पुरुष कबड्डी स्पर्धेत गोव्याने उपांत्य फेरी गाठत ब्राँझपदक जिंकले. त्या स्पर्धेत नेहाल गोव्याचा प्रमुख चढाईपटू होता. स्पर्धेतील सहाही सामन्यांत तो खेळला होता.

‘‘प्रो-कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे आनंद झालाच आहे, मात्र आता जबाबदारीही वाढली आहे. कारकिर्दीतील अत्यंत मोलाचा क्षण आहे,’’ अशी प्रतिक्रिया नेहालने दिली. सध्या तो सोलापूर येथील बार्शी येथे शारीरिक शिक्षणातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

नेहालने गोवा कबड्डी संघटनेचे आश्रयदाते दत्ताराम (बाबू) कामत, अध्यक्ष रुक्मिणी कामत, शालेय शिक्षक, प्रशिक्षक, नेहमी प्रोत्साहन देणारे आई-वडील यांना कबड्डीतील आतापर्यंतच्या प्रगतीचे श्रेय दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT