Watch Video| Niraj Chopra Twitter
क्रीडा

Watch Video: Golden Boy ने चाहत्यांसोबत केला गरबा रास

निरज चोप्राचा गरबा रासचा व्हिडिओ सोशल मिडीयार खुप व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरातमध्ये प्रथमच राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राही यावेळी उपस्थित होता. तिथे त्यांनी जे केले ते गुजरातचेच नाही तर देशवासीयांचे मन जिंकले. अलिकडेच डायमंड लीगचे विजेतेपद पटकावून देशाला अभिमान वाटावा असा नीरज चोप्राने वडोदरा येथे झालेल्या एका कार्यक्रमात जोरदार गरबा केला. यावेळी त्यांच्यासोबत चारू शर्माही उपस्थित होत्या. दोघांनी मिळून तिथे उपस्थित लोकांसोबत जबरदस्त डान्स केला.

नीरजचा हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो गरबा करताना दिसत आहे. गुजरातचा गरबा जगभरात प्रसिद्ध आहे. जेव्हा नीरज तिथे पोहोचला तेव्हा तो गरबा (Garba) करण्यास स्वतःला रोखू शकला नाही.

यापूर्वी नीरजने यावेळी नॅशनल गेम्समध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगदरम्यान नीरज म्हणाला, "माझ्या हा लास्ट कार्यक्रम होता. मी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घ्यायचो पण ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे माझे झुरिच स्पर्धेसह कालावधी संपला आहे. प्रशिक्षकाने मला मला विश्रांती घेण्याचा आणि पुढच्या सीजनसाठी तयारी करण्याचा सल्ला दिला."

तो पुढे म्हणाला की, "अॅथलीटसाठी विश्रांतीही तितकीच महत्त्वाची असते. आम्ही फक्त स्पर्धा आणि पदकांचा विचार करू शकत नाही." पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 29 सप्टेंबर म्हणजे आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरातमधील (Gujrat) 6 शहरांमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार आहेत. 7 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. 2015 मध्ये केरळमध्ये शेवटचे आयोजन झाले होते. यावेळी 7,000 हून अधिक खेळाडू 36 वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT